ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा:-राष्ट्रीय श्रमिक आघाडी चे नेते यशवंत भाऊ भोसले यांच्या भेटीने श्री.छ.खा.भोसले यांना वाढता पाठिंबा.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

राष्ट्रीय श्रमिक आघाडी चे नेते यशवंत भाऊ भोसले यांच्या भेटीने श्री. छ. खा. भोसले यांना वाढता पाठिंबा.

 

सातारा दि: पृथ्वी ही शेषनागाच्या म स्तकावर नसून श्रमिकांच्या तळहातावर उभे आहे. असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी नमूद केले होते. आज या श्रमिकांचे नेतृत्व करून त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे श्रमिक कामगार आघाडीचे नेते व सातारा जिल्ह्याचे सुपुत्र यशवंत भाऊ भोसले यांची आज सातारा येथील जल मंदिरात श्री. छ. खा. उदयनराजे भोसलेंसोबत सातारा लोकसभेच्या निवडणुकी च्या अनुषंगाने भेट झाली व उभयतात निवडणुकीच्या पुढील रणणनीती बाबत चर्चा झाली.
या वेळी छ. उदयनराजे यांनी यशवंत भाऊंना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देऊन त्यांचे स्वागत केले.

सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असलेले श्रमिक कामगार आघाडीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत भाऊ भोसले यांनी श्रमिक विकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कामगार चळवळीमध्ये आपले अटळ स्थान निर्माण केले आहे, राज्यात राष्ट्रीय श्रमिक आघाडीचा या त्यांचे नेतृ्वाखालील कामगार संघटनेचा चांगलाच दबदबा आहे.
सातारा जिल्ह्यातील शिरवळ, सातारा, देगाव, कराड, तळबीड, वाई, फलटण , कोरेगाव,खंडाळा अशा विविध भागातील औद्योगिक वसाहती मधील कामगारांना न्याय देण्यासाठी श्रमिक कामगार आघाडीच्या वतीने त्यांनी अनेक आंदोलने केली आहेत. या प्रत्येक आंदोलनाला यश मिळाले आहे. साताऱ्यातील श्रमिक कामगार आघाडीचे सर्व कामगार हे छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांना मानणारे आहेत. त्यांचे मताधिक्य वाढवण्याची जबाबदारी श्रमिक कामगार आघाडी निश्चितच पार पाडतील. असा विश्वास भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या भेटी दरम्यान व्यक्त केला. या पूर्वी उदयनराजे खासदार म्हणून विजयी झाले तेव्हा, यशवंतभाऊ भोसले सातारा जिल्हा महाराज प्रचंड मताधिक्क्याने विजयी व्हावेत म्हणून पिंजून पिंजून काढला होता.

खरं म्हणजे ही निवडणूक लोकसभेची असून या निवडणुकीच्या माध्यमातून देशभरातील कामगारांच्या हिताचे निर्णय संसदेत घेण्यासाठी श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले हे सक्षमपणे साथ देतील असा विश्वास या भेटीच्या वेळी यशवंत भाऊंनी व्यक्त केला.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button