श्रीरामपूर:-ग्रामदैवत शिवपूरी नाथ महाराज यात्रेला जोरदार सुरुवात.
प्रतिनिधी संजय पगारे श्रीरामपूर:-9921180022

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी संजय पगारे श्रीरामपूर
श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी ग्रामदैवत शिवपुरी नाथ महाराज यात्रा उत्सवाला जोरदार सुरुवात दोन दिवस चालणाऱ्या हया यात्रा उत्स वामध्ये मंदीरावर विविध प्रकारची नेत्र दिपक विद्युत रोषणाई केली जाते. तसेच शिवपुरीनाथ महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणुक संपुर्ण गावात मिरवली जाते या यात्रेला दुर दुर वरून भाविकांची अलोट गर्दी दर्शना साठी येत असतात. यात्रेमध्ये कुठल्याही प्रकार चे गालबोट लागणार नाही याची सुद्धा दक्षता घेतली जाते.तसेच दुसऱ्या दिवशी 24/4/2023 रोजी लावणी सम्राज्ञी सिने तारका माया पुणेकर यांच्या लावण्यरंग ऑक्रेस्ट्रा चे आयोजन केले गेले आहे. तरी सर्व भाविकांनी शिवपुरीनाथ महाराज यांचे दर्शन व नंतर ऑक्रेस्ट्रा बघण्यासाठी लाखोच्या संख्येने उपस्थित रहावे अशी यात्रा कमेटीच्या वतीने सर्व भाविकांना नम्र विनंती समस्त ग्रामस्त माळेवाडी