सातारा / मुंबई :-नगर पंचायत समित्यांमध्ये वर्ग–१ व वर्ग–२ अधिकारीच जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी म्हणून नियुक्त करावेत — डॉ. विजय दिघे यांची मागणी.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

सातारा / मुंबई :-नगर पंचायत समित्यांमध्ये वर्ग–१ व वर्ग–२ अधिकारीच जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी म्हणून नियुक्त करावेत — डॉ. विजय दिघे यांची मागणी.

माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत पंचायत समिती स्तरावर सध्या विस्तार अधिकारी (पंचायत) यांची जनमाहिती अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येते. तथापि, ही नियुक्ती कायदेशीरदृष्ट्या अपुरी असून, महाराष्ट्र राज्य माहिती आयोग, मुंबई यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत की पंचायत समिती स्तरावर वर्ग–१ व वर्ग–२ दर्जाचे अधिकारीच जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी म्हणून नियुक्त करणे आवश्यक आहे.
यासंदर्भात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार चळवळीचे नेते, तसेच “माहिती अधिकार पुस्तक” चे लेखक डॉ. विजय दिघे यांनी ग्रामविकास मंत्री व ग्रामविकास विभागाचे सचिव –
ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन (Department of Rural Development, Government of Maharashtra), ग्रामविकास भवन, ९ वा मजला, मंत्रालय, मुंबई – 400032
यांना ई-मेलद्वारे अधिकृत निवेदन पाठवले आहे.
डॉ. दिघे यांनी त्यांच्या निवेदनात नमूद केले आहे की,
राज्य माहिती आयोग, मुंबई यांचे दिनांक 18/09/2025 रोजीचे पत्र (क्र. मुमाआ–2025/प्र.क्र.119/02),
राज्य माहिती आयुक्त, अमरावती खंडपीठ यांचे पत्र दिनांक 02/11/2023,
तसेच ग्रामविकास विभागाचे पत्र दिनांक 14/06/2012,
या सर्व आदेशांनुसार पंचायत समिती स्तरावर योग्य दर्जाचे अधिकारी नियुक्त करणे बंधनकारक आहे.
> “विस्तार अधिकारी हे कनिष्ठ पद असून, त्यांच्याकडून माहिती देण्यात अनेक वेळा विलंब होतो किंवा अपील प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात. त्यामुळे नागरिकांना माहिती मिळण्यात अडचणी येतात. शासनाने या त्रुटीची दखल घेऊन वर्ग–१ आणि वर्ग–२ दर्जाचे अधिकारीच या पदांवर नियुक्त करावेत,”
अशी ठाम मागणी डॉ. विजय दिघे यांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले —> “माहितीचा अधिकार हा पारदर्शक आणि उत्तरदायी शासनाचा पाया आहे. उच्च पदस्थ अधिकारी नियुक्त केल्यास नागरिकांना वेळेत व विश्वसनीय माहिती उपलब्ध होईल.”
आपल्या लोकप्रिय दैनिक, साप्ताहिक किंवा डिजिटल माध्यमात हे निवेदन प्रसिद्ध करून जनहितासाठी सहकार्य करावे, ही नम्र विनंती.
आपल्या माध्यमाद्वारे सत्य माहिती व नागरिकांच्या हक्कांचा आवाज पोहोचविण्यासाठी आपण नेहमीच सकारात्मक भूमिका निभावत आहात, त्याबद्दल मनः पूर्वक आभार व्यक्त केले.
लेखक –
✍️ डॉ. विजय दिघे
लेखक, “माहिती अधिकार पुस्तक”
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार चळवळीचे नेते
🏠 पत्ता:
डॉ. विजय दिघे
सातारा – 415004
📞 मोबाईल: 9325298018




