पुणे:-धनकवडी, पुणे येथे महिलांसाठी व्यवसायिक मेळावा संपन्न.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष
RPS STAR NEWS
9 जानेवारी 2025 रोजी धनकवडी, पुणे येथे महिलांसाठी व्यवसायिक मेळावा संपन्न.
पुणे : धनकवडी पुणे येथे सौ. सोनाली तुषार कोदे आणि सौ. कोमल पारेख यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना व्यावसायिक मेळावा घेण्यात आला. व्यावसायिक महिलांच्या मार्फत इतर छोट्या व्यावसायिकांना मदत व्हावी या उदात्त हेतूने व्यावसायिक मेळावा आयोजित केला होता.
यावेळी दंताळे ज्वेलर्स यांनी येऊन व्यावसायिक महिलांना खुप छान गिफ्ट दिले. तसेच
लिनेस क्लब ऑफ पुणे सिंहगड दर्शन प्रेसिडेंट लिनेस वर्षा सतीश गवते मॅडम यांनी सुध्दा व्यावसायिक महिलांना मार्गदर्शन केले.
स्वतः च्या व्यावसायाची माहिती सर्व महिलांनी यावेळी दिली आणि खरेदी विक्री सगळ्यांची झाली. या या कार्यक्रमाला कर्णबधिर मुलांचा सुद्धा समावेश होता.
महिलांना वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या आणि बक्षिसे देण्यात आली. या कार्यक्रमा वेळी सर्व महिलांना व्यवसाय संदर्भातील योग्य मार्गदर्शन मिळाल्याने सर्व महिलांनी समाधान व्यक्त केले.