सातारा:-हेच उद्याच्या भारताचे भविष्य असेल…
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष
हेच उद्याच्या भारताचे भविष्य असेल…
ह्या चिमुकलीला नीट पहा…
हीच असेल उद्याची पी. टी. उषा….
आणि आपल्या सातारा जिल्ह्याचा अभिमान.
भविष्यात आपल्या देशासाठी ऑलिम्पिक साठी खेळताना आणि एखादे पदक मिळवून देताना दिसली तर नवल वाटायला नको कारण ही अवघ्या नऊ वर्षाची आहे आणि काल वडूज जि. सातारा येथे संपन्न झालेल्या खुल्या मॅरेथॉन स्पर्धेत हीने 5 की.मी अंतर फक्त 23 मिनिटे आणि 45 सेकंदात पूर्ण केले.
या चिमुकलीच्या यशाबद्दल अभिनंदन….
हिचे पूर्ण नाव आहे *कु. प्रज्ञा उमाजी पाटोळे रा. पेडगाव ता. खटाव जि. सातारा.* आपल्या आश्रमशाळेचा माजी विद्यार्थी आणि माझा बालपणीचा मित्र उमाजी पाटोळे याची ही कन्या
हिला हे यश सहज मिळाले नाही तर तिचा सराव आणि तिचे कष्ट पाहीले तर मोठ्या माणसांना सुद्धा तिचा हेवा वाटला पाहिजे.
ती सध्या विटा या गावी राहते. ती दररोज पहाटे उठून तेथील असणाऱ्या कॉलेजच्या मैदानावर जाऊन सराव करते. पोलीस भरतीसाठी सराव करणाऱ्या मुलांबरोबर धावते. 20-20 किलोमीटर सायकल चालवते.
आठवड्यातून एकदा सातारा जिल्ह्यातील विविध किल्ले आणि डोंगरावर जाते. हे करताना कधीच कंटाळा करत नाही.
हिच्या घरात जाऊन पाहीले तर हिला सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर बाहेरील जिल्ह्यातील होणाऱ्या विविध मॅरेथॉन स्पर्धा सहभाग आणि यशाबद्दल मिळालेली बक्षिसे सर्व काही सांगून जातात..
या चिमुकलीच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा….
*शब्दांकन – श्री. महेशकुमार बोभाटे सर*
*ब्रह्मपुरी (रहिमतपूर)*