कराड:-श्री क्षेत्र कालगाव तालुका कराड येथे अखंड हरिनाम सप्ताह सांगता.
पत्रकार सुशीलकुमार पुजारी कराड तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सुशीलकुमार पुजारी कराड तालुका उपाध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
श्री क्षेत्र कालगाव तालुका कराड येथे अखंड हरिनाम सप्ताह सांगता. श्री समर्थ रामदास स्वामी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व विरसंत हरिभक्त पारायण बंडातात्या कराडकर अण्णाभाऊ कालगावकर यांच्या जन्मभूमी असलेल्या श्रीक्षेत्र कालगाव तालुका कराड येथे अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला .सप्ताहाचे 38 वे वर्ष आहे. सप्ताहामध्ये दररोज पहाटे पाच ते सहा काकड आरती सकाळी आठ ते 11 व दुपारी तीन ते पाच श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचन सायंकाळी सहा ते सात प्रवचन सात ते आठ हरिपाठ रात्री नऊ ते 11 कीर्तन व साडेअकरा नंतर हरी जागर झाला. दिनांक २-२-2025 रोजी हरिभक्त पारायण सिद्धनाथ महाराज शामगाव दिनांक 3 -2 2025 रोजी हरिभक्त पारायण दत्ता महाराज खेडेकर दिनांक ४-२-२०२५ रोजी हरिभक्त पारायण सुरज महाराज अंतवडी दिनांक ५-२-२०२५ रोजी हरिभक्त पारायण संतोष महाराज पाडळी दिनांक 6 -2 2025 रोजी हरिभक्त पारायण सुहास फडतरे बेलवाडी दिनांक ७-२-२०२५रोजी हरिभक्त पारायण अक्षय महाराज कडवे दिनांक 8 -2 -2025 रोजी हरिभक्त पारायण विजय महाराज लोणीकर यांचे हरिकीर्तन झाले.तसेच ९-२-२०२५ तसेच नवनीत महाराज करगणी कर यांचे काल्याचे किर्तन पार पडले. बेलवाडी, चिंचणी ,पाडळी ,हेळगाव कवठे पेरले ,गोसावी वाडी, तुकाईचीवाडी, कोपर्डे, काशीळ पंचक्रोशीतील भजनी मंडळाचा चक्रीभजनाचा कार्यक्रम झाला आहे. तसेच ९-२-२०२५ या दिवशी गावातील भव्य दिंडी सोहळा संपन्न झाला. तसेच गावातील ग्रामस्थ कालभैरव भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.