ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सुपणे ग्रामपंचायतीचे गावातील रस्त्यांकडे दुर्लक्ष

प्रतिनिधि:- मारूती सोमुत्ते कराड

जरा इकडे पण लक्ष द्या–सुपने ग्रामपंचायत..

सुपने गावात श्री संतोष सुतार यांच्या घरासमोर गेल्या कित्येक महिन्यापासून गटार वरील रस्ता खचला आहे,बरोबर मध्यभागी हा खड्डा आहे, त्यामुळे याठिकाणी अपघाताचे प्रसंग घडू शकतात,सदर रस्ता जि प प्राथमिक शाळा व अंगणवाडी यांना जोडला असून लहान मुलांची ,विद्यार्थ्यांची देखील वर्दळ या ठिकाणी असते.तसेच गजाभाऊ सुतार यांच्या घरासमोरील चौकात देखील अशा प्रकारचा खड्डा आहे. सदरचे खड्डे हे अत्यंत धोकादायक असून स्थानिक नागरिकांनी वारंवार ग्रामपंचायत सुपने यांच्याकडे याबद्दल तक्रार केली आहे…
परंतु सुपने ग्रामपंचायतला अजूनही या रस्त्यावरील खड्डयाचे गांभीर्य कळले नाही.याठिकाणी एखादी दुर्घटना घडायची वाट तर ग्रामपंचायत बघत नाही ना असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे…..सुपने ग्रामपंचायतने हा प्रश्न गांभीर्याने घ्यावा अन्यथा लवकरच याबाबत युवा वर्गाकडून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा श्री गणेश पाटील ( हिंदू एकता आंदोलन पाटण तालुका अध्यक्ष) यांनी दिला आहे

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button