वाई:-भाजपा सदस्य नोंदणी अभियान वाई येथे संपन्न.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
भाजपा सदस्य नोंदणी अभियान वाई येथे संपन्न.
दिनांक : 5/2/2025
आज वाई शहर व तालुका भाजपा च्या वतीने भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य आदरणीय माजी आमदार मदनदादा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व सातारा जिल्हा महिला अध्यक्षा डॉ. सुरभी ताई भोसले यांच्या नेतृत्वात किसन वीर महाविद्यालयाच्या प्रवेश द्वारा बाहेर भाजपा सदस्य नोंदणी 2024/25 अभियान राबविण्यात आले.
या अभियानास कॉलेजच्या युवक व युवतींचा उत्तम प्रतिसाद लाभला. अनेक तरुण, तरुणीनी मा. नरेंद्रजी मोदी साहेब व मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत भाजपा चे सदस्यत्व स्वीकारले. देशातील सर्वात लोकप्रिय व देशभक्त राजकीय पक्षाचे काम करण्याची ईच्छा अनेकांनी व्यक्त केली. अशाप्रकारे आजचे हे सदस्य नोंदणी अभियान सफलतापूर्वक पार पडले. त्याप्रसंगी उपस्थित माजी प्रदेश सदस्य अविनाशजी फरांदे,भाजपा सातारा जिल्हा सरचिटणीस रोहिदास बापू पिसाळ, वाई तालुका उपाध्यक्ष संतोष शिंदे, वाई शहर सरचिटणीस प्रशांतजी नागपूरकर, उपाध्यक्ष विकास जाधव, अमित वनारसे, कोषाध्यक्ष सुनील साठे,कामगार मोर्चा अध्यक्ष श्रीकांत कुंभार, चिटणीस सारिका ताई गवते, अनु. जाती मोर्चा तालुका उपाध्यक्ष कु.श्वेता वैराट, बेटी बचाव बेटी पढाव अध्यक्षा भारती ताई कुलकर्णी, युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष गणेश जायगुडे, जेष्ठ सदस्य एस पी टिके व कॉलेजचे नवीन युवा सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर सदस्यता नोंदणी अभियानात भाग घेतलेल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
विजय ढेकाणे,
अध्यक्ष भाजपा वाई शहर.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन