वाई:- किसन वीर महाविद्यालयातील डॉ. अंबादास सकट आदर्श संशोधक पुरस्काराने सन्मानित.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
वाई दि 4 किसन वीर महाविद्यालयातील डॉ.अंबादास सकट आदर्श संशोधक पुरस्काराने सन्मानित.
वाई येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील इंग्रजी विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. अंबादास दादासाहेब सकट यांना दुर्गा सोशल फाऊंडेशन, सोलापूर यांच्या वतीने प्रतिवर्षी देण्यात येणारा राष्ट्रीय स्तरावरील आदर्श संशोधक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
शैक्षणीक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकास हा पुरस्कार दिला जातो. डॉ. अंबादास सकट हे किसन वीर महाविद्यालयात गेल्या तेरा वर्षांपासून इंग्रजी विभागात कार्यरत आहेत. त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व मुल्क राज आनंद या दोन भारतीय लेखकांच्या निवडक कादंबऱ्यांवर तुलनात्मक संशोधन करून शिवाजी विद्यापीठाची पीएच. डी. पदवी संपादन केली आहे. त्यांचे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या यादीतील नियतकालिकात तसेच पुस्तकात अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाची दखल घेऊन डॉ. सकट यांना सदर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
दुर्गा फाऊंडेशन, सोलापूर यांचा हा एक प्रतिष्ठित व सन्मानाचा पुरस्कार आहे. डॉ. अंबादास सकट यांनी सदर पुरस्कार व सत्कारामुळे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करण्यास प्रोत्साहन मिळते व जबाबदारी वाढते अशी भावना व्यक्त केली व दुर्गा सोशल फाऊंडेशन, सोलापूर यांच्या प्रती आदर व्यक्त केला.
याबद्दल जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले, उपाध्यक्ष मा. शंकरराव गाढवे, सचिव डॉ. जयवंत चौधरी, खजिनदार प्रा. नारायण चौधरी, सर्व संचालक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, उपप्राचार्य, सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.