म्हैसाळ:-(मिरज)-कर्मवीर विद्यालय म्हैसाळ मध्ये खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
कर्मवीर विद्यालय म्हैसाळ मध्ये खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न.
म्हैसाळ(ता. मिरज )
रयत शिक्षण संस्थेच्या म्हैसाळ येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालया मध्ये आज हळदी कुंकू समारंभ व खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन म्हैसाळ गावच्या माजी सरपंच सौ. मनोरमादेवी शिंदे यांच्या हस्ते व सौ.लता मनोज जाथव, सौ उषा अजित कबुरे, सौ मोहिनी धनंजय कुलकर्णी,विद्यालयाचे प्राचार्य श्री पाटील एस एच यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी म्हैसाळ गावातील बहुसंख्य महिलांनी या कार्यक्रमात हजेरी लावली.
हा कार्यक्रम म्हैसाळ गावातील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक व कलाकार श्री.सुशांत जाधव यांनी नृत्य,विविध सिने कलाकारांचे आवाज, कॉमेडी, तसेच विविध प्रकारचे खेळ घेऊन उपस्थित महिलांचे मनोरंजन केले. आणि निवेदक म्हणून स्वरांजली संगलगे व अक्षदा शिंदे यांनी अतिशय उत्कृष्ट काम पाहिले.
पैठणीचे प्रथम 3 मानकरी
1.सौ. नेहा भोरे
2. सौ.प्रीती बंडगर
3. सौ. जयश्री राजेंद्र सरडे
तर इतर 12 बक्षिसे देण्यात आली.
म्हैसाळ गावातील साईराम कलेक्शनचे मालक श्री. मोटगी साहेब यांनी या कार्यक्रमासाठी तीन पैठणी बक्षीस म्हणून दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एस .डी .जावळे सर यांनी केले तर आभार सौ. ए.टी .तेली मॅडम यांनी मानले.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य श्री . पाटील एस. एच., पर्यवेक्षक श्री लादे एस.डी. यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.