साताऱ्यात पालकमंत्री समर्थकांचा धुडगूस व बघ्याची भूमिका?
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
साताऱ्यात पालकमंत्री समर्थकांचा धुडगूस व बघ्याची भूमिका?
सातारा दि: सातारा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था कायम राहावी. यासाठी प्रामाणिकपणाने प्रयत्न करणारे सातारा जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांची सातारा जिल्हा पालकमंत्री पदी निवड झाल्यानंतर साताऱ्यात प्रथमच आगमन झाले. या आगमनाच्या स्वागतासाठी त्यांच्या कथित समर्थकांनी सातारा शहरातील शिवतीर्थावर धुडगूस घातला. यावेळी काहींच्या बघेवादी भूमिकेने यंत्रणा हतबल झाल्याचे दिसून आले. सातारा शहरातील या स्वागत नाट्याने अनेकांनी शांत बसण्याचा धन्यता मानली.
याबाबत माहिती अशी की, सातारा जिल्ह्याच्या हद्दीतील शिरवळ येथून महायुतीतील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे पर्यटन, खाण व माजी सैनिक कल्याण कल्याण विभागाचे कॅबिनेट मंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्या स्वागताचे नियोजन करण्यात आले होते. परंतु, तीन तास उशीर झाल्यामुळे जागोजागी स्वागत स्वीकारून नामदार देसाई हे सायंकाळी सातारा येथील शिवतीर्थावर आले. यावेळी त्यांच्या कथित समर्थकांनी कर्कर्ष आवाजात डी.जे. व रस्त्यावर तुफान गर्दी केल्यामुळे लहान मुलं अक्षरशा भयभीत झाली होती. तर काही वाहन चालकांना आपापली वाहने कुठे घेऊन जावे ? हेच कळत नव्हते. गोंधळामुळे व कर्कश आवाजाच्या डीजे मुळे कायदा व सुव्यवस्था अंग चोरून गपचूप बसल्याचे दिसून आले. अनेकांची छाती धडधडत होत होती .पण याचं कुणालाच सोयर सुतक नव्हते.
शिवतीर्था वर नेहमीच अनेकांचे अनेकांचे सत्कार व स्वागत केले जाते .पण ,शुक्रवार दिनांक २४ जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन साजरा होत असतानाच शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वाहनातून बाहेर डोकावून बालिका आनंद उत्सव साजरा करत होते. फुलांची उधळण व डीजे आवाजाने परिसर दणाणून गेला होता. पण, काहींचे कान बंद असल्याने त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचला नाही. याचे सुद्धा यानिमित्त नवल वाटत आहे. भारतीय राज्यघटनेप्रमाणे जनतेला त्रास होत असेल तर पोलीस यंत्रणा गुन्हा दाखल करते. तशी फिर्याद देते आणि त्याची माहिती सुद्धा देते. पण, यावेळी असं काहीच घडले नाही. कायदा व सुव्यवस्था वाऱ्यावर असल्याचे जेष्ठ नागरिकांनी मनोगत व्यक्त केले. ये तो सिर्फ झाकी है और धुडगूस बाकी है असंच म्हणावे लागेल. याबाबत आता नेमके पालकमंत्र्यांच्या समर्थक होते की त्या गर्दीत घुसून काहींनी जाणीवपूर्वक धुडगूस घातला हे मात्र समजू शकले नाही. याबाबत पालकमंत्र्यांनीच खुलासा केलेला बरा अशी मागणी होऊ लागलेली आहे. दरम्यान , सातारा जिल्हा पालकमंत्री बदलाच्या भूमिकेने अशा पद्धतीने बदला घेण्यात आल्याची चर्चा सर्वत्र सुरू झालेली आहे.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन
फोटो सातारा शहरातील शिवतीर्थावर पालकमंत्र्यांच्या समर्थकांची झालेली गर्दी व गैरसोय (छाया- अजित जगताप सातारा)