श्रीरामपूर:-सर्वांत मोठ्या शिवपुराण कथेत १२ ज्योतिर्लिंग – चारीधामाचे जबरदस्त डेकोरेशन …..
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
1) सर्वांत मोठ्या शिवपुराण कथेत १२ ज्योतिर्लिंग – चारीधामाचे जबरदस्त डेकोरेशन …..

श्रीरामपुर ( प्रतिनिधी ) राहत्या जवळीलअस्तगाव – निर्मळ पिंपरी परिसरामध्ये जनसेवा फाउंडेशनच्या वतीने पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली देशातील सर्वात मोठा शिवपुराण महाकथेची आयोजन करण्यात आले आहे प्रदीप मिश्रा यांच्या माध्यमातून ही महा कथा होणार आहे
जवळपास 75 एकरावर कथेचे आयोजन होणार असून येथे 12 ज्योतिर्लिंग व चारीधाम तीर्थक्षेत्र चे अतिशय सुरेख देखावे साकारण्यात आले आहे १२ ऑक्टोंबर ते १६ ऑक्टोंबर दरम्यान होणाऱ्या या शिवपुराण महाकाथेमध्ये शेवटच्या दिवशी जवळपास सात ते आठ लाख भाविक सामील होतील असा जनसेवा फाउंडेशनचा विश्वास आहे महाकथेमध्ये विखे पाटलांच्या जनसेवा फाउंडेशनच्या वतीने अतिशय चोख व्यवस्था भाविक भक्तांची करण्यात येणार आहे.
2) योगराज गंगगिरीजी महाजन ( सरला बेट ) यांचे उत्तराधिकारी प.पु.हरिगिरीजी महाराज यांची १०३ वी पुण्यतिथी सोहळा माळेवाडी येथे झाला.

श्रीरामपुर ( प्रतिनिधी ) सराला बेट हे गोदावरी नदीकाठी वसलेले एक प्राचीन तीर्थक्षेत्र आहे तेथे सद्गुरू हरिगिरीजी महाराज यांनी कठोर साधना केली आणि योगिराज म्हणून ओळख मिळवली हे बेट वारकरी संप्रदायाचे केंद्र आहे .जिथे अखंड हरिनाम सप्ताह आणि इतर धार्मिक परंपरा सुरू आहेत . महंत रामागिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानचा विस्तार झाला आहे आणि येथे गोशाळा व अनाथा श्रमही चालवले जातात.
हरिगिरी महाराज आणि गंगागिरी महाराज सराला बेट
साधना आणि योग सद्गुरू गंगागिरी महाराजांनी सराला बेटावर कठोर साधना केली आणि ते योगिराज म्हणून ओळखले जाऊ लागले.धार्मिक परंपरा त्यांनी बेटावर वारकरी संप्रदायाची भक्ती आणि सप्ताहाची परंपरा सुरू केली जी आजही अखंडपणे सुरू आहे.




