ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-सातारा जिल्ह्यात रस्त्याचे देयक मिळणेसाठी दिव्यांग ठेकेदाराची होते ससेहोलपट.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

सातारा जिल्ह्यात रस्त्याचे देयक मिळणेसाठी दिव्यांग ठेकेदाराची होते ससेहोलपट.

सातारा दिनांक जडदाकट व सुदृढ माणसाला शासकीय काम करून देत मिळवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात तरीसुद्धा वेळेत देत मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे परंतु दिव्यांग असलेल्या ठेकेदाराला दोन वर्षापासून सातारा जिल्ह्यात रस्त्याचे काम करूनही एक मिळवण्यासाठी ससेहोलपट करावी लागत आहे आता याबाबत प्रहार संघटनेचे नेते माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांनीच लक्ष घालावे अशी मागणी संबंधित ठेकेदाराने केलेली आहे.
याबाबत माहिती अशी की, खटाव तालुक्यातील जायगांव या गावात रोजगारहमी योजनेंच्या माध्यमातून रस्ता खडीकरण केले आहे. कुशल व अकुशल कामांसाठी प्रामाणिकपणाने दिव्यांग ठेकेदार बाळासाहेब सावंत यांनी कष्ट घेतलेले आहेत. जायगांव, ता. खटाव
येथील काटेश्वरी वस्ती विहीर शिवाराकडे जाणारा रस्ता पूर्ण केला असून
गेली २ वर्षे त्याची वहिवाट सुरु आहे. सदर कामाचे अकुशल कामासाठी ९,२८,६७.५३ व कुशल कामासाठी ३,६८,३०४.९८ असे मिळून
१२,९६,३७३ रुपये खर्च झालेले आहेत. सदरचे काम पूर्ण झाले असून सध्या या रस्त्याचा वापर स्थानिक ग्रामस्थ करत आहेत. तसेच हा रस्ता केल्याबद्दल लोकप्रतिनिधींचा गौरव सुध्दा करण्यात आला आहे. प्रचलित धोरणानुसार
सर्व गोष्टीची पूर्तता करुन रस्त्याच्या कामाचे देयक द्यावे यासाठी जायगांव ग्रामपंचायत,
खटाव पंचायत समिती (वडुज) व बांधकाम विभाग वडुज, सातारा जिल्हा
परिषद, सातारा जिल्हाधिकारी याठिकाणी कागदपत्रांची पुर्तता करुन हेलपाटे
मारलेले आहेत. तरी सुध्दा देयक मिळाले नाही.
देयक मिळावे यासाठी मी ये-जा करीत असताना दिव्यांग ठेकेदार बाळासाहेब सावंत यांचा अपघात झाला असून अपंग झालेले आहेत. कुटुंबियावर रोजगार हमी
योजनेंच्या कामावर जाण्याची वेळ आलेली आहे. विशेष म्हणजे भारत देशामध्ये
ठेकेदाराला व त्याचे कुटुंबियाला रोजगार हमी योजनेंच्या कामावर जाऊन
जगण्याची वेळ आलेली आहे. याची द ग्रिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी.अशी ही कामगिरी आहे.
आर्थिक अडचणीमुळे ‘गतिमान सरकार, सरकार आपल्यादारी’ हे घोष वाक्य वाचून मनाला वेदना होत आहेत. बऱ्याच गोष्टी व्यक्त
करायच्या आहेत. देयक मिळाले तर आर्थिक प्रश्न सुटणार आहे. सध्या उपजिविकेसाठी दिव्यांग ठेकेदार घराच्या बाहेर राहत असून देणीकरांच्या देणी चुकविण्यासाठी न्यायालयात बेपत्ता होण्याचे शपथपत्र जोडत आहे.
या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. अन्यथा दि. २४ ऑक्टोंबर
२०२३ रोजी विजयादशमी दिनी न्यायालय, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी व
जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय, बांधकाम विभाग, सातारा यापैकी सोईच्या
ठिकाणी बनावट चलनी नोटांचे तोरण बांधून शासनाचा निषेध व्यक्त करणार
आहे. तत्पूर्वी आपण सदर घटनेची चौकशी करुन न्याय द्यावा. सदरचे
निवेदन हे पैसे नसल्यामुळे उधार टायपिंग करुन घेतले आहे. यामुळे माझ्या
परिस्थितीची आपणांला कल्पना येईल. सई संबंधित दिव्यांग ठेकेदाराने माहिती दिलेली आहे. सध्या आपल्या कामाचे देयक मिळवण्यासाठी दिव्यांग ठेकेदार जिल्हा परिषद व शासकीय विश्रामगृहामध्ये हेलपाटे मारत असून त्याला केव्हा न्याय मिळेल असा प्रश्न अनेकांना पडला आहे
——————————-+–
फोटो -सातारा जिल्हा परिषद व शासकीय विश्रामगृह सातारा या ठिकाणी देयक मिळवण्यासाठी हेलपाटे मारणारे दिव्यांग ठेकेदार सावंत (छाया- अजित जगताप, सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button