मुंबई:-बिलाची रक्कम मंजूर करण्यासाठी 2 लाखांची लाच स्विकारताना म्हाडा उपअभियंत्यास अटक.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
बिलाची रक्कम मंजूर करण्यासाठी 2 लाखांची
लाच स्विकारताना म्हाडा उपअभियंत्यास अटक.
मुंबई, दि. 6 (शफिक शेख):- खासदार फंडातून केलेल्या विकासकामांच्या रकमेचे बील मंजूर करण्यासाठी फिर्यादी यांच्याकडून 2,00,000/- रूपये रकमेची लाच स्विकारताना श्री. आकाश प्रकाश भुरे, उपअभियंता (वर्ग 1), झोपडपट्टी सुधार मंडळ, म्हाडा कार्यालय, बांद्रा (पूर्व), मुंबई यांस लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई यांनी रंगेहाथ पकडून अटक केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी हे कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी खासदार फंडातून कुर्ला, वाकोला, भारतनगर परिसरात लादी बसविणे, गटार लाईन व इतर डागडुजीची कामे केली आहेत. या कामाची रक्कम मंजूर करण्यासाठी फिर्यादी हे श्री. भुरे यांना वारंवार भेटत होते. त्यावेळी भुरे यांनी फिर्यादी यांच्याकडे सदर बील मंजूर करण्यासाठी रक्कम रूपये 2,00,000/- च्या रकमेची लाच म्हणून मागणी केली. फिर्यादी यांनी त्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई येथे केली.
त्यानुसार ला. लु. प्र. विभाग मुंबई यांनी तपासणी केली असता आरोपी श्री. भुरे यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यासाठी विभागाने दिनांक 3/1/2023 रोजी सापळा रचला आणि फिर्यादी यांच्याकडून रक्कम रूपये 1,50,000/- रूपयांची लाच स्विकारताना आकाश भुरे यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरूद्ध कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 नुसार गुन्हा नोंद करण्यात आली आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त ला. लु. प्र. वि. बृहन्मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाने केली. यावेळी ला. लु. प्र. वि. बृहन्मुंबई विभाग यांच्यातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले की, कोणत्याही भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास किंवा तक्रार असल्यास ला. लु. प्र. वि. बृहन्मुंबई विभाग यांचेशी संपर्क साधावा.
संपर्क – लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बृहन्मुंबई विभाग, 91 सरपोचखानावाला मार्ग, वरळी मुंबई.
टोल फ्री नं. 1064, दूरध्वनी क्र. 022-24921212, फॅक्स क्र. 022-24922618
वेबसाईट – acbmaharashtra.gov.in
ईमेल – acbwebmail@mahapolice.gov.in / addlcapcbmumbai@mahapolice.gov.in
मोबाईल अॅप – www.acbmaharashtra.net
फेसबुक आयडी – www.facebook.com-maharashtraACB