ताज्या घडामोडी

सातारा:-रिपब्लिकन पक्षाच्या सातारा तालुका अध्यक्षपदी विजय ओव्हाळांच्या निवडीने जल्लोष.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली मान्यता प्राप्त )

रिपब्लिकन पक्षाच्या सातारा तालुका अध्यक्षपदी विजय ओव्हाळांच्या निवडीने जल्लोष.

सातारा दि: महामानव व घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेशी संलग्न असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गट सातारा तालुका अध्यक्षपदी युवा नेतृत्व विजय गोरख ओव्हाळ यांची आज साताऱ्यातील रिपब्लिकन भवन मध्ये एक मताने निवड करण्यात आली.
या निवडीमुळे सातारा तालुक्यामध्ये जल्लोष सुरू झालेला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे गटाचे राष्ट्रीय नेते आदरणीय दिपक भाऊ निकाळजे व राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी महाराष्ट्रामध्ये नव्या जोमाने, नव्या उमेदीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गट निर्माण केलेला आहे. ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होऊन सुद्धा कोणतीही प्रतिक्रिया उमटवण्यास कार्यकर्ता पुढे येत नाही . अशा वेळेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गट सर्वसामान्य माता, भाऊ ,बहिण ,मातापित्यांची काळजी घेण्यासाठी व त्यांच्यावर अन्याय होत असेल तर त्यांची भेट घेऊन दिलासा देत आहे. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कोणतेही तमा न बाळगता रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते त्यांनी निर्माण केलेले आहेत. त्यापैकी विजय ओव्हाळ हे गेले बारा ते पंधरा वर्ष रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून संघर्ष योद्धा म्हणून किरण ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत काम करत आहेत.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सातारा तालुका अध्यक्षपदी निवड झालेली आहे. सातारा तालुक्यातील परळी भाग, कास पठार ,नागठाणे ,क्षेत्र माऊली, लिंब, वडूथ , अराळे व सातारा शहरातील दलित पीडित शोषित कष्टकरी व वंचित समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी विजय ओव्हाळ हे कटिबद्ध आहेत . लवकर सातारा तालुक्यातील रिपब्लिकन कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा घेऊन पुढील दिशा ठरवण्यात येईल. असाही त्यांनी कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीत सांगितले. या वेळेला शाल श्रीफळ व निवृत्ती पत्र देऊन श्री विजय ओव्हाळ यांचा सत्कार करण्यात आला. या निवडीबद्दल कामगार आघाडीचे मदन कंकाळ दीपक भोसले सुनील ओव्हाळ सिद्धार्थ समिंदर वाहतूक संघटनेचे नेते राजेंद्र ओव्हाळ, दादा गायकवाड, राजू शिंदे, सागर गरड, अजय ओव्हाळ, किशोर डेंगळे, सनी गालफाडे, सोमनाथ देखणे, राजेंद्र होटकर, सर्जेराव विणकर यांच्यासह विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी श्री विजय ओव्हाळ यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button