सातारा:-अधिकारी व लोकप्रतिनिधींकडून साताऱ्यात बचत गटाची खरेदीची ””उमेद ”’पूर्ण
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली मान्यताप्राप्त )
अधिकारी व लोकप्रतिनिधींकडून साताऱ्यात बचत गटाची खरेदीची ””उमेद ”’पूर्ण
सातारा दि: महिला सक्षमीकरणासाठी खूप मोठे प्रयत्न होणे गरजेचे आहे. महिला बचत गट आता विविध वस्तूंची निर्मिती करीत आहेत. सामान्य व्यक्ती व कर्मचारी मनमुराद त्या वस्तू खरेदी करत आहेत. आता बचत गटाकडून लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांकडून जिल्हा परिषदेच्या मैदानावर मानिनी जत्रेतून खरेदी करण्याची ”””’ महिला वर्गाकडून वाढलेली आहे. त्याला प्रतिसाद म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील
, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यशानी नागराजन, आमदार मनोज घोरपडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद् यांनी भेट दिली व सामाजिक जाण ठेवणाऱ्या पत्रकारांनाही खरेदी करण्याची सूचना केली.
सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर उमेद महिला बचत गटाच्या मिनी सरस माननीय जत्रेचे उद्घाघाटन झाले आहे. दि:२१जानेवारीपर्यंत सुमारे ७९ महिला बचत गटाने विविध वस्तू व खाद्यपदार्थ विक्रीसाठी आणलेले आहेत. या ठिकाणी सामान्य सातारकर व काही कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय मनमुराद खरेदी करत आहेत. सातारा जिल्ह्यातील महिला गटाला सक्षमीकरण करण्यासाठी या ठिकाणी येऊन खरेदी करावी व त्याची सेल्फी आपल्या मोबाईल मध्ये ठेवल्यास त्यांची प्रेरणा घेऊन अनेक जण खरेदी करतील. असा सार्थ विश्वास महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या मानिनी जत्रेमध्ये विविध उत्पादने व त्यांना मिळणारा प्रतिसाद उदंड आहे. लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांनी खरेदी करावी. ही उमेद आहे. ही उमेद पूर्ण झाल्यानंतरच खऱ्या अर्थानं अशा जत्रेला यश मिळेल. अन्यथा अंधेरी नगरी, चौपट राजा… नुसताच वाजंत्री वाजवतात…. बँड बाजा… असं त्याच्या सुरू होऊ नये. अशी विनंती महिला बचत गटाच्या पदाधिकारी व खरेदीसाठी आलेल्या वैशाली जाधव, दिपाली माने, करिष्मा सय्यद, नम्रता पवार यांच्यासह अनेक महिलांनी केलेली आहे. त्यांच्या मताशी सहमत होऊन आज मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी खरेदी केली. यामध्ये पत्रकारही सामील झाले होते.
या मानिनी जत्रेसाठी सातारा जिल्हा परिषद तसेच विविध विभागातील विभाग प्रमुखांनी दुपारच्या वेळेला कर्मचाऱ्यांना सूट दिलेली आहे. या कालावधीमध्ये विशेषतः महिला कर्मचारी सातारा जिल्हा परिषद मैदानावरील स्टॉलमध्ये येऊन खरेदी करत आहेत .ही सुखद बाब आहे.
या मानिनी जत्रेसाठी माण खटाव पासून ते महाबळेश्वर पाचगणी पर्यंतच्या अनेक माता-भगिनींनी सहभाग घेऊन खऱ्या अर्थाने जत्रा फुलवलेली आहे . या यात्रेचे उत्कृष्ट नियोजन केले असून खरेदीमध्ये सुद्धा आता आपलं कौशल्य दाखवावे आणि ही यात्रा यशस्वी करावी. अशा पद्धतीने योजनाबद्ध कार्यक्रम व्हावा. हीच श्रीची इच्छा असल्याचे बोलले जात आहे.. उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, निलेश घुले , गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांच्यासह अधिकारी वर्ग या यात्रेसाठी परिश्रम घेत आहेत त्यांचे सर्व मान्यवरांनी कौतुक केले.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन
__________________________________
फोटो.. सातारा येथील मानिनी जत्रेतील सामान्य माणसांची खरेदीसाठी झुंबड (छाया- अजित जगताप, सातारा)