मायणी:-कचरेवाडी मायणी येथील मूलभूत समस्या दूर करा – अन्यथा आमरण उपोषण.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक
RPS STAR NEWS
कचरेवाडी मायणी येथील मूलभूत समस्या दूर करा – अन्यथा आमरण उपोषण.
मायणी प्रतिनिधी—कचरेवाडी मायणी येथील मूलभूत समस्या दूर न केल्यास दिनांक 24 रोजी शुक्रवारी आमरण उपोषणाचा इशारा येथील तरुण कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीला दिला याबाबत अधिक माहिती अशी की येथे असणाऱ्या गैरसोयी बाबत 28 एप्रिल 2024 रोजी तरुण कार्यकर्त्यांनी निवेदन दिले होते पण याबाबत कोणतीच कार्यवाही सरपंच अथवा ग्रामसेवक यांनी केली नाही या परिसरात रस्त्यात खड्डे खड्ड्यात रस्ता हे समजत नाही येथील सांडपाण्याची खूप वाईट अवस्था आहे सर्व सांडपाणी रस्त्यावर येते सुरुवातीपासून या सांडपाण्यावर ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले असल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले येथे कोणतीही सुविधा नाही औषध फवारणी केली जात नाही तसेच येथील अंगणवाडीची दयनीय अवस्था झाली आहे यामुळे वयस्कर माणसे आजारी पडत आहेत चिकनगुनिया सारख्या रोगाचा धोका संभवतो अशा पीडित लोकांनी एकत्र येऊन हे निवेदन दिले आहे जर ग्रामपंचायतीने कारवाई केली नाही तर येत्या 24 रोजी सकाळी आठ वाजता ग्रामपंचायत समोर आमरण उपोषणाचा इशारा दिन इशारा दिला आहे अशी माहिती युवानेते राजू कचरे यांनी दिली.