छ्त्रपती संभाजीनगर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे जिल्हा सचिव प्रविण आप्पा नितनवरे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन.
पत्रकार विनायक मोहन श्रीरामपूर तालुका जनसंपर्क प्रतिनिधी

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार विनायक मोहन श्रीरामपूर तालुका जनसंपर्क प्रतिनिधी
RPS STAR NEWS
छ्त्रपती संभाजीनगर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे जिल्हा सचिव प्रविण आप्पा नितनवरे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन.
जिल्ह्यातील वंचित समाजावर दु:खाचे सावट
दि. १२ छत्रपती संभाजी नगर मधील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चे जिल्हा सचिव आदरणीय प्रविण आप्पा नितनवरे यांचे आज दुपारच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले.
त्यांच्या निधनाची वार्ता जिल्हा भर वणव्यासारखी पसरली हजारोंच्या संख्येने समाजाने उपस्थित राहून प्रविण आप्पा यांना अखेरचा निरोप दिला.
जिल्ह्यातील सर्व गटातील कार्यकर्ते, वाळूज आणि गंगापुर पोलिस स्टेशन मधील अधिकारी कर्मचारी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ सरपंच उपसरपंच सदस्य पदाधिकारी तसेच सर्व नातेवाईकांनी दु:खद अंतःकरणाने शेवटचा निरोप दिला.
त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या कुटुंबाला धीर देत जिल्हा अध्यक्ष अमित भुईगळ यांनी कुटुंबाचे तसेच वंचित समाजाचे सांत्वन केले.
प्रविण आप्पा नितनवरे यांनी जिल्हा संघटक जिल्हा सचिव तसेच जिल्हा सरचिटणीस अशा पदांवर नियुक्ती कालावधीत कार्य केले आहे.