सातारा:-(तापोळा)-श्री ऊत्तेश्वर देवीच्या यात्रेने तापोळा भागात भाविकांची जोरदार तयारी…
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
श्री ऊत्तेश्वर देवीच्या यात्रेने तापोळा भागात भाविकांची जोरदार तयारी…
तापोळा दि:
महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण उतेकर व गोगावले परिवाराचे तसेच कोयना जलाशयाच्या परिसरातील १०५ गावचे प्रमुख देवस्थान श्री ऊतेश्वर देवाची यात्रा सोमवार दिनांक 13 जानेवारी रोजी होत आहे. या यात्रेच्या सहभागासाठी संपूर्ण तापळा परिसर गजबजून गेलेला असून जल्लोष सुरू झालेला आहे. ठाणे, मुंबई ,पनवेल, नवी मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर व सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून भाविक यात्रेसाठी निघाले आहेत. रात्रीच्या वेळी होणारी ही बहुदा देशातील पहिलीच यात्रा आहे.
शिवसेना पक्ष प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री नामदार श्री एकनाथ शिंदे यांचे श्री. उत्तरेश्र कुलदैवत देवस्थान आहे .श्री उतेश्र्वर देवस्थान ट्रस्ट,वाळणे ता. महाबळेश्वर जिल्हा सातारा संचलित श्री उतेश्वर देवालय यात्रोत्सव २०२५सालाबादप्रमाणे सोमवार दिनांक १३ जानेवारी ते १५ जानेवारी २०२५ रोजी श्री उतेश्र्वर देवालय वाळणे येथे श्री उतेश्र्वर देवांचा यात्रोत्सव मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरा केला जात आहे
सोमवारी दिनांक.१३.१.२०२५ संध्या.४ ते ७ वाजता .स्थळ: वानवली उतेकर येथे श्री उतेश्वर यांचा घाणा कार्यक्रम .रात्री ९.०० वाजता: श्री उतेश्र्वर देवांची पालखी यात्रा स्थळाकडे प्रस्थान.पहाटे ४.०० वाजता: श्री उतेश्वर पालखीचे मंदिर स्थळी आगमन.
मंगळवारी दिनांक १४.०१.२०२५ रोजी सकाळी ७ ते ९ वाजता : श्री उतेश्र्वर देवांचा अभिषेक कार्यक्रम.सकाळी १० ते दुपारी ४ वाजता पर्यंत : श्री उतेश्र्वर देवांचा पालखी दर्शन.संध्या.४ ते ६ वाजता : यात्रा स्थळी शिवलिंगाची पुजा व आरती.संध्या.६ ते ८ वाजता : श्री उतेश्र्वर दर्शन रांग.रात्री ८ ते ९ वाजता : दीपमाळ प्रज्वलन व यात्रा आरंभ.रात्री ९ ते १० वाजता : देव देवतांचे आगमन.रात्री १० वाजता: उत्सव मंचाचे उद्घाघाटन.रात्री १० ते १ २ वाजता : सुप्रसिध्द ऑर्केस्ट्रा.रात्री १२ वाजता: श्री उतेश्र्वर देवांचा छबिना कार्यक्रम व तळे भरणे कार्यक्रम व मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम.रात्री १ ते सकाळी ६ वाजेपर्यंत: कासेगावकर कराडकर यांचा लोकनाट्य तमाशा कार्यक्रम.
बुधवार दिनांक १५ रोजी सकाळी ६.३० वाजता: श्री उतेश्र्वर देवांचा शाही विवाह सोहळा कार्यक्रम.सकाळी ८.३० ते १२.३० वाजता: श्री उतेश्वर पालखी दर्शन व परतीचे दर्शन सोहळा.सकाळी १२.३० ते ४ वाजता : यात्रा समाप्ती व तळे भरणे कार्यक्रम .यात्रोत्सव २०२५ चे मान्यवर:
नामदार श्री एकनाथ शिंदे . खा श्रीकांत शिंदे साहेब , मंत्री मकरंद पाटील ,जयकुमार गोरे, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री शंभूराज देसाई व खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, श्री प्रकाश शिंदे, मा.नगरसेवक ठाणे महानरपालिका व स्थानिक ग्रामस्थ व उद्योजक गणेश उत्तेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या यात्रेसाठी अध्यक्ष व सर्व कार्यकारिणी.श्री उतेश्र्वर विकास मंडळ मुंबई ग्रामस्थ: श्री उतेश्र्वर देवालय वाळणे, वांनवली उतेकर, गावढोशी, निवळी, रवदी, दरे तर्फ तांब.समस्त श्री उतेकर व गोगावले भावकी परिश्रम घेत आहेत. आपल्या मायभूमीत आलेल्या अनेक भाविकांचे ग्रामस्थांच्या वतीने जागोजागी स्वागत केले जात आहे. अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार तानाजी मालुसरे, अक्षय गोरे ,निलेश शिंदे, सूर्यकांत पवार यांनी दिली आहे.