कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरेगाव:-राजवंश आठवडा बाजार संघटनेकडून पिंपोडे बुद्रुक येथील संतोष मोरे यांना आर्थिक मदत.

सह संपादक अशितोष चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

सह संपादक अशितोष चव्हाण

राजवंश आठवडा बाजार संघटनेकडून पिंपोडे बुद्रुक येथील संतोष मोरे यांना आर्थिक मदत.

अर्धांगवायूच्या उपचारासाठी करण्यात आली संघटनेकडून आर्थिक मदत.

पिपोडे बुद्रुक: अभिजीत लेंभे

सातारा जिल्ह्यात अल्पावधीतच नावारूपाला आलेली राजवंश आठवडा बाजार संघटना ही गोरगरीब व असंघटित कामगारांसाठी समाजात एक आगळे वेगळे कार्य करीत असून खरोखर ज्यांचे हातावरचे पोट आहे व ज्यांच्यावर अचानकपणे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे अशांना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी राजवंश आठवडा बाजार संघटना ही काम करीत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या काही दिवसांपूर्वी पिंपोडे बुद्रुक येथील आठवडा बाजार करणारे भाजी विक्रेते संतोष मोरे यांना अचानकपणे अर्धांगवायू झाल्याने त्यांचे कुटुंब मोठ्या संकटात असल्याने त्यांना काही प्रमाणात आर्थिक हातभार लागावा म्हणून राजवंश आठवडा बाजार संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबाला व त्यांच्या पुढील उपचाराला आर्थिक मदत व्हावी म्हणून सर्व आठवडा बाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून संतोष मोरे यांच्या कुटुंबाला एक हात मदतीचा देण्यात आला. ही आर्थिक मदत पिंपोडे बुद्रुक येथील आठवडे बाजारात संतोष मोरे व त्यांच्या पत्नी यांना थेट देण्यात आली यावेळी बाजार संघटनेचे अध्यक्ष जयवंत पवार, उपाध्यक्ष मुकुंदराज काकडे, सचिव अर्जुन मामा आवटे, खजिनदार गणेश कुर्ले, संचालक आण्णा कांबळे, नागेश चव्हाण, मधुकर साळुंखे, संभाजी पिसाळ, विनोद पवार, अमृत गार्डी, राजू बाबर, संदीप यादव, अभिजित कांबळे, अजय तेली, विजय यादव, शत्रुघ्न यादव, मंगेश जाधव, मंगेश गार्डी, अमोल यादव, चेतन यादव, वनिता वळकुंदे, सुगंधा मोरे, विठ्ठल जाधव, अशोक कांबळे, चंद्रकांत कासार या व अन्य व्यापाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये संतोष मोरे व कुटुंबीयांना आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button