सातारा:-जि.प.क्रीडा महोत्सव पुढील वर्षी राज्यस्तरीय – मंत्री जयकुमार गोरे
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
जि.प.क्रीडा महोत्सव पुढील वर्षी राज्यस्तरीय – मंत्री जयकुमार गोरे
सातारा दि: सातारा जिल्हा परिषद वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव निमित्त डोळ्याची पारणे फेडणारा साताऱ्यातील छत्रपती शाहू स्टेडियम मध्ये सातारा जिल्हा परिषद क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव साजरा झाला. या महोत्सवाने खऱ्या अर्थाने सर्व अधिकारी व स्पर्धेत सहभागी घेणाऱ्या कर्मचारी कौतुकास पात्र असून जिल्हा परिषद क्रीडा महोत्सव पुढील वर्षी राज्यस्तरीय घेण्याची घोषणा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सातारा येथे केले.
दिनांक १० ते १२ जानेवारी या कालावधीमध्ये विविध स्पर्धा होत आहे .या स्पर्धेचे उद्घाघाटन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते झाले . यावेळी सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद , पोलीस अधीक्षक समीर शेख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री निलेश घुले, अर्चना वाघमळे ,महादेव घुले, शिक्षण अधिकारी श्रीमती शबनम मुजावर, डॉ. विनोद पवार, अभियंता मोहसीन मोदी, अभियंता गाढवे, जिल्हा क्रीडा अधिकारी तारळकर, गटविकास अधिकारी यांच्यासह भाजप सातारा जिल्हा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम व विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सातारा येथील छत्रपती शाहू स्टेडियम मध्ये झालेल्या या स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्यातील अकरा पंचायत समिती सातारा जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचारी वर्ग सहभागी झाले होते. कोरेगाव पंचायत समितीने खऱ्या अर्थाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सातारा जिल्हा परिषदेमध्ये खऱ्या अर्थाने सर्वधर्मसमभावाची शिकवण आचरणात आणणे गरजेचे आहे अशी शिकवण दिली . सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रोत्सानामुळे सातारा जिल्हा परिषद कर्मचारी खेळाडू मोठ्या जोमाने चित्ररथ साजरा करण्यासाठी सज्ज झाले होते. अनेक हिंदुत्ववादी विचाराची कास धरणाऱ्या या चित्ररथातून रामायण व महाभारत त्याचबरोबर पण एक देवदेवतांचाही तसेच महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचाही प्रसार करण्यात आला .
कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या मनातील ताण तणाव कमी करण्यासाठी या स्पर्धा उपयुक्त ठरल्याची चर्चा केली जात आहे. नेटके नियोजन व अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने झालेल्या या क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाने खऱ्या अर्थाने जिल्हा परिषदेचे नावलौकिक संपूर्ण राज्यात पसरले आहे. ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी केलेल्या कौतुकाने सर्वजण भारावून गेले असून मंत्री महोदयासोबत करण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. त्या सर्वांनाच वेळ देऊन मंत्री महोदयांनी अनेकांची मने जिंकली. या महोत्सवासाठी शिक्षक ग्राम विकास अधिकारी लिपिक तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी खूप मोठे योगदान दिले. दरम्यान, मंत्री महोदयांच्या आगमनापूर्वीच व्यासपीठावर मोठी गर्दी झाल्यामुळे अनेक अधिकारी व्यासपीठाच्या खाली उभे होते. उभे राहूनच क्रीडा स्पर्धेचे चांगल्या पद्धतीने नियोजन केले.
———————————————–
फोटो सातारा
जिल्हा परिषद क्रीडा महोत्सवात मार्गदर्शन करताना नामदार जयकुमार गोरे व सेल्फी काढताना कर्मचारी (छाया- अजित जगताप सातारा)