ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा:-पै.साहेबरावभाऊंचा १०१ वा वाढदिवस असाच जोरदार साजरा करू- पृथ्वीराज चव्हाण

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

 

पै.साहेबरावभाऊंचा १०१ वा वाढदिवस असाच जोरदार साजरा करू- पृथ्वीराज चव्हाण

सातारा दि: जावळीचे सुपुत्र आदरणीय मार्गदर्शक पैलवान साहेबराव भाऊ पवार यांचा सातारा तालीम संघाच्या मैदानावर शंभरावा वाढदिवस साजरा झाला. पुढील वर्षी असाच १०१ वा वाढदिवस जोरदार साजरा करू अशा शब्दात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा येथे शुभेच्छा दिल्या.
यावेळी अनेक मान्यवरांनी भाऊंचे आशीर्वाद घेऊन त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. जावळी तालुक्यातील दरे गावचे सुपुत्र असलेल्या पैलवान साहेबराव पवार भाऊ यांनी महाराष्ट्राच्या कुस्तीला नावलौकिक प्राप्त करून देण्यासाठी अनेक सहकारी पैलवान पैलवानांच्या सोबत तालीम संघाची उभारणी केली. एवढेच नव्हे तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, जावळीचे माजी सभापती, जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष, सत्यशोधक विचारांचे पाईक ,क्रीडा संघटक व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशा अनेक चौफेर ठिकाणी आपले कर्तव्य दाखवून दिले.
आज सातारा शहरातील तालीम संघ मैदानावर कोणतीही सत्ता नसताना पैलवान साहेबराव पवार भाऊ यांच्या शंभरावा वाढदिवस साजरा करताना अनेक जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या चित्रमय चरित्र पाहून भाऊंच्या कार्याची ओळख अनेकांना झाली. रविवारी १५ सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत जिल्हा तालीम संघाचे मैदान कार्यकर्त्यांनी भरून गेले होते. शुभेच्छा देणाऱ्यांची रीघ लागली होती. विशेष म्हणजे पैलवान साहेबराव पवार यांच्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर परराज्यातूनही अनेक जण आले होते.
यावेळी आपल्या छोट्याशा शुभेच्छा भाषणात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मी लोकसभेचा काँग्रेसचा उमेदवार असताना माझे बोट धरून जावळीतील गावोगावी त्यांनी प्रचार केला. त्यावेळी जावळी व महाबळेश्वर तालुका व सातारा तालुक्यातील छत्तीस गावे जावळी विधानसभा मतदारसंघात होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात भाऊंनी आपला दांडका जनसंपर्क दाखवून दिला. साहेबराव भाऊंनी मला प्रचंड प्रेम व आशीर्वाद दिले आहेत. भाऊंनी ज्यांना घडवले त्या सर्व एकत्र जमण्याचे पाहून हृदय भरून येत आहे. ताठ मानेने व स्वाभिमानाने कसे जगावे? याचे जलद उदाहरण म्हणजे साहेबराव भाऊ आहेत. महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला याची चिंता आहे ती बदलून दाखवण्याची धमक साहेबराव भाऊ यांच्यासारख्या कार्यकर्त्यांमध्ये नक्कीच आहे स्वर्गीय विलास काका उंडाळकर यांची काँग्रेस पुन्हा मजबूत करण्यासाठी भाऊंच्या आशीर्वाद महत्त्वाचे आहेत सध्या वर्णव्यवस्थेकडे वाटचाल सुरू असून फुले शाहू आंबेडकर यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराचा शाश्वत राहिले पाहिजे यासाठी प्रयत्न करणार आहे. असे स्पष्ट करून माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी आदरणीय साहेबराव भाऊ यांच्या १०१ वा पुढील वर्षी वाढदिवस अशाच पद्धतीने जोरदार साजरा करावा अशी त्यांनी सूचना केल्या.
यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील ,आमदार शशिकांत शिंदे, डॉ .सुरेश जाधव, आनंदराव कणसे, अमित कदम , सागर पावशे, नासीर शेख, बुवासाहेब पिसाळ, विठ्ठल मोरे, अंकुश दुदुसकर , विजय महाडिक,गणेश जगताप ,दादा रासकर, महाराष्ट्र केसरी धनाजी फडतरे, किरण साबळे पाटील, पैलवान साहेबराव जाधव, प्रभाकर शिंदे, ऍड उदयसिंह पाटील, रजनी पवार, शंकरराव गाढवे, बापूराव पार्ट, आनंदराव जुनघरे ,अशोक परामणे, जनार्दन नवले, विकास भिलारे, राजू जेधे ,हिंदुराव पाटील, सुनील माने, राजकुमार पाटील, , अजित भोसले, सुरेश मोरे, दुर्योधन महामुलकर, किरण माने, प्रकाश गवळी, अण्णा वायदंडे, गुरुदास अडागळे, विशाल कदम, शहाजी गुजर व जिल्ह्यातील विशेषता जावळी, सातारा, वाई, कराड, महाबळेश्वर तालुक्यातील अनेक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी पैलवान साहेबराव पवार भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भेटून पुष्पगुच्छ, हार, शाल, देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी स्नेह भोजनाच्या कार्यक्रमासाठी सर्व सातारा जिल्हा व परिसरातील सामाजिक राजकीय शैक्षणिक पत्रकारिता व कार्यकर्त्यांनी धन्यवाद दिले.
यावेळी ऐतिहासिक व भावनिक कामासाठी भाऊंचे पत्नी आदरणीय सौ सोनूबाई साहेबराव पवार, सुपुत्र- मदन पवार, दिपक पवार, सुधीर पवार, बाळासाहेब पवार, मुलगी- मीरा पवार- इंगळे, पुतणे- शंभूराज पवार यांच्यासह पवार कुटुंबीयांनी तसेच त्यांच्या मित्र परिवारांनी खूप मोठे परिश्रम घेतले होते. पुन्हा एकदा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी भाऊंनी सक्रिय व्हावे. अशी मनोकामना तरुण कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. या ऐतिहासिक व भावनिक सोहळ्यासाठी पैलवान संदीप मांडवे यांनी सूत्रसंचालन केले. सातारा तालीम संघाच्या मैदानावर””’ जय श्रीराम”” अक्षरांची रांगोळी काढून आदरणीय पैलवान साहेबराव पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. त्या सर्वांच्या लक्ष वेधून घेत होत्या.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button