मायणी:-खटाव माण कडून उसाचा पहिला हप्ता जमा.
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक
RPS STAR NEWS
खटाव माण कडून उसाचा पहिला हप्ता जमा.
मायणी प्रतिनिधी—-सातारा सांगली सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा आर्थिक उत्पन्नाचा कणा असलेला खटाव माण कारखान्याने चालू गळीत हंगामाचा गळीतास आलेल्या ऊस दराचा पहिला हप्ता 2900 प्रति टन प्रमाणे संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात जमा करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रभाकर घार्गे व कार्याध्यक्ष आमदार मनोज घोरपडे यांनी आज दिली तर खटाव माण कारखाना गतवर्षीप्रमाणे दुसरा हप्ताही वेळेत देणार असल्याचे त्यावेळी त्यांनी सांगितले यावेळी ते म्हणाले खटाव माण कारखान्याची यशस्वीरित्या घोडदौड सुरू आहे कारखान्याच्या चालू हंगामात उसाच्या ज्यूस पासून तर इतर वेळी बी हेवी पासून इथेनॉल निर्मिती प्रकल्प सुरू आहे दरम्यान चालू वर्षी साखरेची एम एस पी वाढण्याची शक्यता आहे ती वाढल्यानंतर यापेक्षाही अधिक ऊस दर देण्याचा प्रयत्न कारखाना करणार आहे तसेच गतवर्षीप्रमाणे यंदाही उसाचा दुसरा हप्ता देऊन ऊस बिल वेळेत देण्याची परंपरा कायम ठेवणार आहे खटाव माण कारखान्याची उसाचे पेमेंट पंधरा दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची परंपरा कायम केली यामध्ये सातत्य राहील तरी शेतकऱ्यांनी या कारखान्यास गळीतासाठी ऊस पाठवावा असे आवाहन प्रभाकर घार्गे व आमदार मनोज घोरपडे यांनी केले आहे.