ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

MGM हॉस्पिटलच्या (कामोठे कळंबोली नवी मुंबई ) हलगर्जीपणामुळे ४ वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू – मनसेने प्रशासनाला धरले धारेवर

प्रतिनिधि :- विजय काळे महाराष्ट्र

रविवारी :- 8/05/2022 MGM हॉस्पिटलचा जीवघेणा भोंगळ कारभार – आदई येथील 4 वर्षांच्या लहान मुलाला पाठीवर गाठ आली होती म्हणून उपचारासाठी आणले होते. यावेळी रविवार असल्यामुळे बहुतांश डॉक्टर हॉस्पिटलमध्ये हजर नव्हते. त्यामुळे त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या टेक्निशियनने त्या मुलाला इंजेक्शन दिले. हे इंजेक्शन दिल्यानंतर त्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. पीडित कुटुंब मूळचे नेपाळचे आहे. मुलाच्या मृत्यूनंतर इंजेक्शन देणारा टेक्निशियन फरार आहे. संकेत धुमाळ असे फरार टेक्निशियनचे नाव आहे. याप्रकरणी मुलाचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच गुन्हा नोंद करण्यात येईल.

मुलाच्या मृत्यूनंतर इंजेक्शन देणारा टेक्निशिअन फरार

मयत मुलाच्या कुटुंबीयांनी याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पनवेल शहराध्यक्ष योगेश चिले यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी तत्काळ हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रशासनाला जाब विचारला. त्यानंतर चिले यांनी कामोठे पोलिस ठाणे गाठले. पोलिस ठाण्यात ड्युटीवर उपस्थित असेलेल पोलिस निरीक्षक उत्तम जगदाळे यांची भेट घेत या प्रकरणात तपास करून व प्रशासनाला दोषी ठरवून त्यांच्यावर कडक कारवाई करा असे चिले यांनी सांगितले. पोलिस पुढील तपास करत आहेत. टेक्निशिअन संकेत धुमाळ फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. रुग्णालय प्रशासन याबाबत काहीही प्रतिक्रिया देण्यास तयार नाही. मनसे नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाला रविवारी दुपारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी रुग्णालयात डॉक्टर नसल्यामुळे तेथील टेक्निशियनने मुलाला इंजेक्शन दिले. हे इंजेक्शन दिल्यानंतर मुलाचा तात्काळ मृत्यू झाला. मात्र रुग्णालय प्रशासनाने मृत्यू झाल्याचे लपवले आणि मुलावर उपचार सुरु असल्याचे नाटक केले. त्यानंतर आज सकाळी 10.15 वाजता डॉक्टरांनी मुलाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. मुलाचा मृतदेह पनवेलच्या नाना धर्माधिकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. शवविच्छेदन केल्यानंतर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात येईल.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button