ताज्या घडामोडी

सातारा:-संघर्ष योद्धा – आ.शशिकांत शिंदे.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

संघर्ष योद्धा – आ.शशिकांत शिंदे.

आजचा १९ ऑक्टोबर हा दिवस सुवर्ण अक्षराने नोंदवण्यासारखा आहे. कारण ज्यांच्या प्रेरणेमुळे सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील माथाडी कामगारांना न्याय देण्याची भूमिका आज सातत्याने घेतली जात आहेत. ते आमदार शशिकांत शिंदे साहेब यांचा आज वाढदिवस आहे. खऱ्या अर्थाने लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सर्वांनी प्रमाणिकपणाने मतदान करून त्यांना शुभेच्छा द्याव्या अशी विनंती यानिमित्त करावी वाटत आहे.

माथाडींचे आराध्य दैवत अण्णासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी चळवळीला झोकून दिलेले आहे. त्याच माथाडी बांधवांच्या समर्थ साथ मिळाल्यामुळे ते १९९९ साली छत्रपतींची राजधानी असलेल्या जावळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पहिले आमदार झाले होते. हुमगाव ता. जावळी हे त्यांचे मूळ गाव असले तरी त्यांची आता संपूर्ण निष्ठा ही कोरेगाव मतदार संघासाठी कायम झालेली आहे.
सलग दोन वेळा जावळीचे आमदार म्हणून त्यांनी काम केल्यानंतर पक्ष नेते व त्यांचे राजकीय कारकीर्द घडवणारे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या आदेशानुसार व जावळी मतदारसंघाच्या पुनर्रचनेमुळे त्यांनी मोठ्या मनाने जावळी ऐवजी नवक्या कोरेगाव मतदार संघात निवडणूक लढवण्याचा धाडसी निर्णय घेतला. माजी महसूल मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांचा पराभव करून त्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली. आज खऱ्या अर्थाने नवक्या कोरेगाव मतदार संघात सलग दोन वेळा निवडून येऊन त्यांनी आपल्या सामाजिक- राजकीय- शैक्षणिक कार्याचे चुणूक दाखवली .दुर्दैवाने सर्व मतदार संघात निवडणुकीच्या काळामध्ये त्यांना २०१९ साली भ्रमंती करावी लागली. आणि याच वेळेला त्यांच्याच पक्षातील काही लोकांनी दगा फटका करून त्यांना पराभूत केले होते .या पराभूत प्रसंगा नंतर किंचितही खचून न जाता त्यांनी फिनिक्स पक्षात गरुड भरारी मारलेली आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या सभागृहात त्यांच्यासारख्या अभ्यासू नेत्याची गरज ओळखून त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. खऱ्या अर्थाने सातारा जिल्ह्याचे पाटबंधारे मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अल्पावधीत त्यांनी केलेल्या कार्याची आजही आठवण काढली जाते. आता नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा कोरगाव विधानसभा मतदारसंघात विजय निश्चित मानला जात आहे. अशाप्रकारे चर्चा आता राजकीय वर्तुळातही सुरू झालेले आहे. आपल्या सोबत किती जण आहेत? याची कधीही आकडेमोड न करता जे कोणी आपल्याकडे आलेले आहेत. त्यांचे काम करणे. हा एकमेव पर्याय म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. आज या निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसहिता असल्यामुळे बरीच शब्दालाही मर्यादा आलेले असल्यामुळे त्यांच्या कार्याला शुभेच्छा देत असताना त्यांच्या अनेक आठवणी या ठिकाणी नमूद कराव्या वाटत आहेत.
माथाडी कामगार नेते स्वर्गीय शिवाजीराव पाटील यांनी जावळी तालुक्यातील मेढा येथे भाषण करत असताना सांगितले होते की, हा माथाडींचा वाघ आहे. हा तुमच्यासाठी चित्त्यागत धाव घेतली. पण, दुर्दैवाने आज स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव स्वर्गीय शिवाजीराव पाटील जरी नसले आणि त्यांचे बंधू नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे भाजप सारख्या विरोधी पक्षात आहेत. तरीसुद्धा माथाडी कामगारांची ताकद आमदार शशिकांत शिंदे यांच्या पाठीशी उभी आहे. आज राजकारणामध्ये अनेक आदल बदल घडलेले आहेत. त्याचा नेमका फायदा आता महाविकास आघाडीला होणार आहे. त्यामुळे विरोधक बेताल आरोप करत आहेत. त्यांची सत्ता असूनही त्यांना आमदार शशिकांत शिंदे हे भविष्यात निवडून येतील याची भीती वाटू लागलेली आहे. रणांगणातील खरा योद्धा कधीही घाबरत नाही तर त्यातून तो मार्ग काढून पुढे जातच असतो ही आमदार शशिकांत शिंदेंची नैसर्गिक लाभलेली देणगी आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांचा एक मताने पराभव झाला. एका बाजूला खूप मोठ्या प्रमाणात राजकीय घराण्याची आतून विरोध करत असताना सुद्धा त्यांनी तब्बल २४ मते प्राप्त केली होती. इतर ११ संचालक बिनविरोध निवडून आले होते. आज आमदार शशिकांत शिंदे यांच्या विरोधात खोटे आरोप करून त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत अडकवण्याचा प्रयत्न झाला पण ज्येष्ठ नेते शरचंद्र पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मोठ्या जिद्दीने प्रचार करून भाजपच्या उमेदवाराला अक्षरशा वाड्या वस्ती पर्यंत फिरून मत मागण्याची वेळ आली. आगामी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आमदार शशिकांत शिंदे यांना विजयी करण्यासाठी आता जनतेनेच ही निवडणूक हाती घेतलेली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांची लायकी काढणाऱ्या विरोधकांना मतपेटीतून मतदार लायकी दाखवतील. हे सूर्यप्रकाश इतके स्वच्छ आहे. काही वेळेला अचानक आकाशात काळे ढग येऊन हलकासा पाऊस पडतो. पुन्हा स्वच्छ वातावरण होते. अशा पद्धतीने कोरेगाव मतदार संघात स्वच्छ वातावरण झालेले आहे. तरुण पिढी त्यांच्या सोबत असून महाविकास आघाडी म्हणजे खऱ्या अर्थाने जनतेचे लोकप्रतिनिधी आहेत. आज विरोधकांकडे सत्ता असल्यामुळे त्या सत्तेचा वापर करून जिल्हा प्रशासनामध्ये अनेकांना आडवा आणि जिरवा असे राजकारण झालेले आहे. ते बदलण्यासाठी खऱ्या अर्थाने आमदार शशिकांत शिंदे यांचा विजय हा निश्चित झालेला आहे.
आमदार शशिकांत शिंदे यांचा वाढदिवस आहे .या वाढदिवसानिमित्त अनेकांनी शुभेच्छा दिलेले आहेत. तसेच काहींनी प्रचार यंत्रणा ही सुरू केलेली आहे. सध्या आचारसंहिता असल्यामुळे खूप मोठा गाजावाजा करून वाढदिवस साजरा करता आला नसला तरी खऱ्या अर्थाने दि: २३ नोव्हेंबर रोजी आमदार शशिकांत शिंदे यांचा वाढदिवस व विजयी अभिनंदन मेळावा नक्कीच स्मरणार्थ राहील. अशा आतापासूनच आम्ही शुभेच्छा देत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तथा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्या विजयासाठी कोरेगाव मतदार संघातील सर्वच कार्यकर्त्यांचे ज्येष्ठ नेते शरद चंद्र पवार साहेब , राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, घटक पक्षाचे सर्वच पदाधिकारी व अध्यक्ष, माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह ज्ञात अज्ञात अनेक जण प्रयत्नशील आहेत. शेवटी या जावळीच्या सुपुत्राने कोरेगाव ही आपली कर्मभूमी मानले आहे. या कर्मभूमीची सेवा करण्याची संधी आमदार शशिकांत शिंदे यांना महिनभरातच मिळेल. अशी प्रामाणिकपणाने अशा व्यक्त करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा हाती तुतारी घेऊन लढणाऱ्या संघर्ष योद्धा यांचे निवडणुकीतील चिन्ह आपल्यासाठी खऱ्या अर्थाने दिशादर्शक व पारदर्शक कामगिरी यासाठी निश्चितच उपयोगी पडेल. हे आतापासूनच अधोरेखित करावे लागणार आहे. तुर्त एवढेच…
आपला- बंटी तथा प्रफुल गंगावणे (शब्दांकन- अजित जगताप)
————————————
फोटो- आमदार शशिकांत शिंदे यांच्या समवेत निष्ठावंत पाईक प्रफुल तथा बंटी गंगावणे

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button