ताज्या घडामोडी

सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समिती यांच्या वतीने पलपब प्रकाशन संस्था अहमदाबाद, गुजरात संस्थेचा सत्कार.

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समिती यांच्या वतीने पलपब प्रकाशन संस्था अहमदाबाद, गुजरात संस्थेचा सत्कार.


११ मे २०२५ रोजी नुकताच पलपब सातारा व पलपब पब्लिकेशन संस्थेच्या वतीने अजिंक्य साहित्यसंगम राज्यस्तरीय एक दिवसीय साहित्य संमेलन सातारा, कोडोली स्वराज्य हॉल वर उत्साहात भव्य दिव्य वातावरणात यशस्वी पडले, या संमेलनासाठी संमेलनाध्यक्ष म्हणून प्राचार्य अनिल बोधे सर, उद्घाटन ज्येष्ठ लेखक सुरेश शिंगटे सर , जेष्ठ लेखिका, रेखा दिक्षित, पाठ्यपुस्तकातील कवी हनुमंत चांदगुडे व प्रमुख पाहुणे म्हणून सातारा ग्रंथ महोत्सव समितीचे कोशाध्यक्ष लेखक,कवी, प्रदीप कांबळे सर उपस्थित होते.या वेळी पलपब पब्लिकेशन संस्था यांच्या साहित्यिक कार्याची दखल घेऊन प्रदिप कांबळे सरांनी सौ.लीना ताई पाटील पलपब सर्वेसर्वा, मा सिद्धार्थ पाटील सर, कवी किरण तोडकर सुर्यवंशी पलपब महाराष्ट्र अध्यक्ष, कवी संदीप पवार पछ्चिम महाराष्ट्राध्यक्ष, व कवी विजय कदम पलपब सातारा अध्यक्ष यांचा सातारी कंदी पेढे देऊन व शाल,श्रीफळ, गुच्छ देऊन सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीच्यावतीने कवी प्रदिप कांबळे व इतर मान्यवर यांच्या हस्ते गुणगौरव आला.हा गुणगौरव म्हणजे खरा साहित्य संगम आहे अशी एकमेकांचा सन्मान करणारी लेखक, कवी मंडळी आहेत म्हणूनच आपल्या मराठी साहित्याचा उगवता सूर्य नेहमी फुलतच राहिल असे कवी किरण तोडकर यांनी सांगितले तर मा.लीना ताई पाटील यांनी सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीचे व कोशाध्यक्ष प्रदिप कांबळे सरांचे पलपब पब्लिकेशन संस्था यांच्या वतीने मनापासून आभार मानले . प्रदीप कांबळे यांनी त्यांच्या भाषणात साहित्य भान ठेवून लिहावे व पलपब पब्लिकेशन संस्था यांच्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनात इतक्या मोठ्या प्रमाणात साहित्यिक उपस्थित आहेत ही खरी यशाची पावती आहे असे सांगितले व आपल्या सुमधूर वाणीने साहित्य संमेलनाचे वातावरण हसते खेळते करून सोडले यावेळी जवळपास ३०० साहित्य प्रेमी हजर होते.या वेळी कवी प्रदिप कांबळे यांना पलपब पब्लिकेशन संस्था अहमदाबाद, गुजरात यांच्या वतीने पलपब साहित्य रत्न सन्मान सन्मानचिन्ह देऊन प्रदान करण्यात आला.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button