शिवाजी स्टेडियम कराड येथे भव्य टेनिस क्रिकेट लीग एस. पी. चषक स्पर्धेचे आयोजन
प्रतिनिधि:- रफीक शेख

शिवाजी स्टेडियम कराड येथे भव्य टेनिस क्रिकेट लीग, एस. पी. चषक स्पर्धेचे आयोजन
कराड, दि.18 (रफिक शेख) : आजपासून सुरू होत असलेल्या भव्य टेनिस क्रिकेट लीग, एस. पी. चषक स्पर्धेचे आयोजन शिवाजी स्टेडियम कराड येथे होत असून याचे थेट प्रक्षेपण युट्यूब लाईव्ह वर होणार आहे.
यावेळी नगरसेवक शिवराज इंगवले, नगरसेवक मोहसीन अंबेकरी , मंजित आत्तार सर, नगरसेवक किरण पाटील, पप्पू पवार साहेब तसेच पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
कै. सुरेश वायदंडे आणि कै. प्रभाकर साळुंखे यांचे स्मरणार्थ भरवण्यात आलेली ही भव्य टेनिस क्रिकेट लीग स्पर्धा आजपासून पाच दिवस चालणाऱ आहे. याचे पहिले बक्षीस 33000/-, दुसरे बक्षीस 22000/-,तिसरे बक्षीस 11000/-,चौथे बक्षीस 7000/- ठेवण्यात आले आहे..
याप्रसंगी एस. पी. स्पोर्ट्स, के के.स्पोर्ट्स, सहारा स्पोर्ट्स, अदिमाया स्पोर्ट्स, पाॅवर स्फोट्स यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
यासाठी मेहबूब शेख, राहुल डुबल, संदिप मोरे, पैगंबर आत्तार, जट्टाप्पा हीप्पलगार, जावेद आत्तार यांचेशी संपर्क साधायचा आहे.