वाई:- राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे मौजे परखंदी येथे आयोजन.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR
RPS STAR NEWS
वाई दि 5 राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे मौजे परखंदी येथे आयोजन.
किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर मौजे परखंदी ता. वाई जि. सातारा येथे शनिवार दिनांक ७/१२/२०२४ ते शुक्रवार दिनांक १३/१२/२०२४ या कालावधीमध्ये आयोजित केलेले आहे.
सदर शिबिराचे उद्घाटन वाईचे प्रांताधिकारी मा. राजेंद्र कचरे साहेब यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने होणार आहे.
जनता शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असतील तसेच वाईच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्या उपस्थितीत शिबिराचा समारोप समारंभ होणार आहे. जनता शिक्षण संस्थेचे संचालक मा. सुरेश यादव हे समारोप समारंभाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
शिबिरामध्ये डॉ. शशिकांत साळुंखे विषय – युवकांपुढील आव्हाने, प्रा. डॉ. विनोद वीर विषय – स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना प्रा. आनंद साठे विषय – या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, श्री. गणेश कोरे विषय – यशस्वी जीवनाचा नवीन मार्ग, डॉ. शिवाजी कांबळे विषय – वाचन संस्कृती आणि आजची तरुणाई श्री. माधवराव गुरव विषय – भारताचे संविधान आणि वैशिष्ट्ये मा. प्रकाश पोतदार विषय – अंधश्रद्धेची दुनिया श्री. मल्लिकार्जुन खटावकर विषय – विद्यार्थ्यांशी हितगुज इत्यादी विषयांवर व्याख्याने होणार आहेत.
तसेच महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, पशुचिकित्सा शिबिर, ग्रामस्थांची आरोग्य तपासणी, भावगीत, गायनाचा कार्यक्रम, ग्रामसफाई, वृक्षारोपण, विविध गुणदर्शन कार्यक्रम, जलसाक्षरता इत्यादी कार्यक्रम होणार आहेत. तरी आपण या शिबिरास भेट देऊन शिबिरार्थींना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे परखंदी गावचे उद्योजक श्री. रतनसिंह शिंदे, सरपंच सौ. चित्रा जाधव, उपसरपंच तात्याबा शिंदे, पोलीस पाटील सुवर्णा महांगडे, ग्रामसेवक भाऊसो शिंदे यांनी केले आहे.