वाई:-ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन आणि आरपीएस स्टार न्यूज या पत्रकार संघाची बैठक वाई शासकीय विश्रामगृह येथे संपन्न.
पत्रकार आशितोष चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आशितोष चव्हाण
RPS STAR NEWS
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन आणि आरपीएस स्टार न्यूज या पत्रकार संघाची बैठक वाई शासकीय विश्रामगृह येथे संपन्न.
वाई प्रतिनिधी
वाई येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार संघाची बैठक संपन्न झाली.या वेळी अध्यक्ष स्थानी राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री प्रल्हाद चव्हाण साहेब उपस्थित होते.यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की आगामी काळात पत्रकारांना मानधन सुरु होईल. जशा पद्धतीने संघटनेची व्याप्ती वाढत आहे तशाच पद्धतीने प्रत्येक घटकांना अर्थिक स्वरुपाचा मोबदला देण्यासाठी पत्रकार संघ अग्रेसर आहे.प्रत्येक पदाधिकारी आणि प्रतिनिधींनी आपल्या भागात चोक कामगिरी बजावणे गरजेचे आहे.समाजातील प्रत्येक घटकांचे बातमिपत्र निष्पक्ष, स्वरुपात असावे.या संघटनेसाठी शासन स्तरावरुन निश्चित सहाय्य मिळेल.प्रतिनिधी जेवढे सजग असतिल तेवढे बातमी पत्र विश्वसनीय होईल.अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवरती राष्ट्रीय अध्यक्ष माननीय प्रल्हाद चव्हाण साहेब त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी पत्रकार संघाचे संचालक उपाध्यक्ष मा.श्री.निलेश मोरे सर यांनी प्रत्येकी प्रतिनिधींचे प्रशिक्षण सत्र महाराष्ट्र भर लवकरच राबविले जाईल यासाठी संचालक मंडळ राज्यव्यापी दौरा करणार असुन प्रत्येक जिल्ह्यातील पत्रकारांच्या समस्या जाणून घेऊन पत्रकार व त्यांचे कुटुंबीय यांनी विमासुरक्षा कवच लकरच अंमलबजावणीत येईल.स्वताचे पत्रकार भवन उभारण्यासाठी संघटना अग्रेसर असुन लवकरच त्याची अंमलबजावणी होईल अशी ग्वाही दिली.
राष्ट्रीय कायदेशीर सल्लागार मा. सौ.अॅड रजनी गाडे मॅडम यांनी कायदेशीर बाबी पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या व सर्वतोपरी कायदेशीर मदत होईल असे हि स्पष्ट केले.पदाधिकारी आणि प्रतिनिधी यांनी कायद्याच्या चौकटीत राहून काम करण्यास प्राधान्य द्यावे असे हि सर्वांना संबोधित केले.माझे खंबीर पाठबळ संघटनेला असेल असेही त्यांनी प्रतिपादन केले.
संचालक मा.श्री.धीरज सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यपद्धतीची कीणार देउन पदाधिकारी यांची कार्यपद्धती विषद केली स्वराज्य उभे रहाताना निःस्वार्थ मावळे सोबत होते.त्यामुळे या महान पर्वाचा विजय झाला.तशीच भूमिका प्रतिनीधींनीची संघटनेप्रती असावी असे मत व्यक्त केले. सावंत सरांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मा.श्री. प्रल्हाद चव्हाण साहेबांनी हातात दिलेला शस्त्राचा कशा पद्धतीने पत्रकार प्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी वापर केला पाहिजे याबाबत सविस्तर माहिती दिली.
या वेळी महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष पदी सौ.निता वाडकार यांची नियुक्ती करण्यात आली.
या प्रसंगी संघटनेच्या मार्गदर्शिका श्रीमती प्रेमा चव्हाण, मा.सौ.अनिता शिंदे महाराष्ट्र राज्य महिला संघटक, मा.सौ. कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष,राष्ट्रीय महासचिव मा. अशितोष चव्हाण साहेब, मा.श्री. उमेश भोपी महाराष्ट्र राज्य संघटक, माननीय श्री प्रमोद देवाडिगा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, माननीय श्री नितीन कुलकर्णी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष, माननीय श्री श्री जाधव महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, मा. सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष,मा.सौ. रेखा येवले सातारा जिल्हा महिला अध्यक्ष, मा.श्री.रमेश किरदत्त सातारा तालुका महासचिव, मा.श्री.सुशील कुमार पुजारी कराड तालुका उपाध्यक्ष,मा. श्री.यशवंत जानकर वाई तालुका अध्यक्ष, माननीय श्री. महादेव बरकडे वाई तालुका सचिव सर्वांची उपस्थिती होती.