ताज्या घडामोडी

सांगली:-सांगलीच्या बंडखोर काँग्रेस नेत्या जयश्री मदन पाटील या 2 डिसेंबर रोजी मोठा निर्णय घेणार तो निर्णय कोणता?

पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा संघटक 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा संघटक

RPS STAR NEWS

सांगलीच्या बंडखोर काँग्रेस नेत्या जयश्री मदन पाटील या 2 डिसेंबर रोजी मोठा निर्णय घेणार तो निर्णय कोणता?

सांगली दी.2
: सांगलीच्या बंडखोर काँग्रेस नेत्या जयश्री मदन पाटील या 2 डिसेंबर रोजी मोठा निर्णय घेणार असल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होती मात्र दोन डिसेंबर रोजी जयश्री मदन पाटील यांनी फक्त योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ इतकेच वक्तव्य करत पुन्हा राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे.सांगली विधानसभा मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर जयश्री मदन पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्या बाबतच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. तसेच जयश्री पाटील या दोन डिसेंबर स्वर्गीय मदन भाऊ पाटील यांच्या जयंती दिवशी मोठा निर्णय घेणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या. त्यामुळे जयश्री मदन पाटील या आज मोठा निर्णय जाहीर करतील अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र स्वर्गीय मदन भाऊ पाटील यांच्या जयंती कार्यक्रमाच्या वेळी जयश्री पाटील यांनी कोणताही निर्णय न घेता योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ अशी भूमिका जाहीर केली. जयश्री मदन पाटील यांच्या या भूमिकेमुळे मात्र कार्यकर्ते निराश झाले पण राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा जयश्री पाटील यांच्या वक्तव्याने खळबळ माजली आहे. त्यामुळे जयश्री मदन पाटील या कोणत्या वेळी कोणता निर्णय जाहीर करतील याबाबत आता चर्चांना उधाण आले आहे. त्यांची योग्य वेळी निर्णय जाहीर करण्याची ती वेळ कोणती? असा सवालही कार्यकर्ते उपस्थित करत आहेत.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन
शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button