वाई:- विद्यार्थ्यांची रोजगार क्षमता वाढविण्यासाठी सामंजस्य करार.
पत्रकार वैष्णवी शिंदे

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे
RPS STAR NEWS
वाई : दि. १९
विद्यार्थ्यांची रोजगार क्षमता वाढविण्यासाठी सामंजस्य करार.
किसन वीर महाविद्यालय व बिग टॅम प्रा. लि. पुणे यांच्यात सांमंजस्य करार. सदर करार हा विद्यार्थ्यांची रोजगार क्षमता वाढवून त्यांच्या प्लेसमेंट साठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या करारा अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी मुलाखत तंत्र, गटचर्चा या सारख्या उपक्रमांचे व औद्योगिक क्षेत्रातील बदलत्या संधी याविषयीच्या कार्यशाळांचे आणी अभियोग्यता चाचणीचे आयोजन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना करिअर विषयी व कौशल्याच्या आधारावर रोजगार मिळवण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. कुशल उमेदवारांसाठी प्लेसमेंट ड्राईव्ह चे आयोजन केले जाणार आहे. हा सामंजस्य करार महाविद्यालयातील सर्व शाखेच्या विद्यार्थ्यांना रोजगारक्षम करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सदर सामंजस्य करार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . गुरुनाथ फगरे, वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे उपप्राचार्य प्रा . भिमराव पटकुरे, कला शाखेचे उपप्राचार्य प्रो. डॉ. चंद्रकांत कांबळे व विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. हनमंतराव कणसे, प्रा. दिपाली चव्हाण व प्रा. संदिप पातुगडे यांच्या उपस्थितीत करणेत आला.