कराड:-पुरस्कार ही प्रामाणिक कार्याची पोचपावती-डॉ.श्री. शेखर कोगनूळकर
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
पुरस्कार ही प्रामाणिक कार्याची पोचपावती-डॉ.श्री.शेखर कोगनूळकर

कराड:- श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्ट कराडचा सन 2024- 25 चा आदर्श शिक्षक पुरस्कार ,श्री शिवाजी विद्यालय ,कराडचे उपशिक्षक श्री.गणेश धोंडू सुकम यांना प्रदान करताना रोटरी क्लब ऑफ कराडचे अध्यक्ष डॉ. शेखर कोगनूळकर यांनी काढले ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. श्री. सुकम सर हे या शाळेचे विद्यार्थी ,त्यांनी शिक्षण पूर्ण करून येथेच प्रामाणिकपणे 31 वर्षे सेवा केली आहे .त्यांच्या प्रामाणिक व सातत्यपूर्ण अध्यापन कार्याने व त्यांनी क्रिकेटमध्ये घडवलेल्या खेळाडूंच्या यशामुळे शाळेचा ,संस्थेचा नावलौकिक वाढला आहे .त्यांच्यासारख्या योग्य शिक्षकांची निवड पुरस्कारासाठी केली हे अभिमानास्पद आहे. याप्रसंगी त्यांनी मीही याच संस्थेचा विद्यार्थी असल्याचे आवर्जून नमूद केले व संस्थेच्या कार्याबद्दल गौरव उदगार काढले.
अध्यक्षीय भाषणात संस्थेचे खजिनदार मा. श्री. संजय बदियाणी यांनी श्री सुकम सर यांच्या प्रामाणिक कार्याची दखल घेऊन त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिल्याचे नमूद केले.या पुरस्कारातून इतर शिक्षकांनीही प्रेरणा घेऊन आपले कार्य उत्तम करावे, असे आवाहन केले.
प्रमुख पाहुणे व मान्यवर यांच्या शुभहस्ते श्री गणेश सुकम यांना सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व वृक्ष रोप भेट देऊन आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष व सचिव मा. श्री .जयंत काका पाटील ,संस्थेच्या उच्च शिक्षण मंडळाचे जनरल सेक्रेटरी अल्ताफहुसेन मुल्ला यांनी श्री. गणेश सुकम यांचे आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संस्थेतील विविध शाखांचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक तसेच सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी, स्नेही उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. टी.डी. जाधव यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्री. ए .बी .रोडे यांनी दिला तर सन्मानपत्राचे वाचन सौ. एस. आर. पवार यांनी केले. मनोगत श्री. ए.डी. झांबरे यांनी व्यक्त केले. आभार कु.कोरे जी.आर .यांनी मांनले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. व्ही. आर पवार यांनी केले.




