ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-छत्रपतींच्या राजधानीत मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाने हादरले प्रशासन.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

छत्रपतींच्या राजधानीत मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाने हादरले प्रशासन.

सातारा दि: महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी म्हणून सातारा परिचित आहे. या ठिकाणी क्रांतीचे बीज रोवली जाते. याच साताऱ्या मध्ये कार्यकर्त्यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले. त्यामुळे जिल्हा प्रशासन हादरून गेले. सदर मराठा समाजात कोणत्याही प्रकारे फूट पाडण्याचा प्रयत्न होणार नाही. असे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
सातारा जिल्ह्यातील सुपुत्र व मराठा क्रांती मोर्चाचे राज्य व जिल्हा समन्वयक जेष्ठ पत्रकार शरद काटकर, दादासाहेब राजेशिर्के, नितीन कणसे, सयाजीराव खामकर हे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उपोषणाला बसले होते .त्यामुळे जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा हडबडून गेले होते. कोणत्याही परिस्थितीत हे उपोषण सुरू झाले तर या ठिणगीचा वनवा होईल. या भीतीपोटी तातडीने हालचाली सुरू करून हे उपोषण स्थगित व्हावे. यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले. राज्य शासनाने मराठा समाजामध्ये कोणत्याही प्रकारची फूट पाडू नये असा गर्भित इशारा राज्य समन्वयक व ज्येष्ठ पत्रकार शरद काटकर यांनी दिला.
मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात पेटलेला वनवा कसा शमावा यासाठी राज्यकर्त्यांची मती गुंग झाली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा असे विभाग करून मराठा समाजात फूट पाडण्याची कूटनिती आखली जात आहे. विदर्भातील कुणबी मराठा करून त्यांना ओबीसी मध्ये आरक्षण देण्याचा कुटील डाव राज्यकर्त्यांनी टाकला असून अशा पद्धतीने जर अध्यादेश काढलास पश्चिम महाराष्ट्र मराठा बांधव त्याला तीव्र विरोध करतील. या आंदोलनाची सुरुवात सातारा राजधानीतून सुरू होईल. असा इशारा राज्य आणि जिल्हा समन्वयक जेष्ठ पत्रकार शरद काटकर यांनी दिला आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या शासनाच्या धोरणाविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे उपोषण आंदोलन छेडण्यात आले असून या आंदोलनाला अनेकांनी पाठिंबा दिला होता. यानंतर सातारचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांना लेखी निवेदन देऊन मराठा क्रांती मोर्चाच्या तीव्र भावना कळविण्यात आलेले आहेत या वेळेला उपोषण करते यांच्यासोबत सागर भोगावकर, श्री.पडवळ उपस्थित होते.
——————————-

कॅप्शन- सातारचे उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देताना आंदोलन करते (छाया- अजित जगताप, सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button