वाई:- किसन वीर महाविद्यालयात स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांना अभिवादन.
पत्रकार वैष्णवी शिंदे

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे
RPS STAR NEWS
वाई:-किसन वीर महाविद्यालयात स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांना अभिवादन.
वाई दि- 14
किसन वीर महाविद्यालयात स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांना अभिवादन:
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील स्टाफ वेल्फेअर समितीच्या वतीने स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांची १३५ वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे यांच्या हस्ते स्व. पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी प्रो. डॉ. सुनील सावंत,प्रो. डॉ. विनोद वीर, प्रो. डॉ. चंद्रकांत कांबळे, प्रा. भिमराव पटकुरे, डॉ. शिवाजी कांबळे यांची विशेष उपस्थिती होती. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात पंडित जवाहरलाल नेहरू याचे मोठे योगदान होते. एक हुशार, उच्चशिक्षित व दूरदृष्टी असणारे पंतप्रधान म्हणून पंडित नेहरू यांची जगभरात ओळख आहे. स्वतंत्र भारताची नव्याने उभारणी करण्याचे आव्हान पंडित नेहरू व त्यांच्या सहकाऱ्यांनी लीलया पेलले. त्यांनी गरिबी निर्मूलन व देशविकासासाठी नवनविन उद्योगधंद्यांना चालना दिली. पंडित नेहरूंनी आपल्या कार्यातून देशप्रेम व राष्ट्रवादाची भावना जनमानसात निर्माण केली. त्यांनी देशात लोकशाही, धर्मानिरक्षता व विज्ञानवाद रुजवला. पंडित नेहरूंना लहान मुलांबद्दल प्रेम व आपुलकी होती. लहान मुलांना प्रोत्साहन मिळावे, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून आपल्या देशात आज सर्वत्र बालदिन म्हणून पंडीत नेहरू यांची जयंती साजरी केली जाते. लोकशाहीची पायाभरणी करणारे, देशात बंधुभाव वाढवणारे व देशाला प्रगतीपथाकडे घेऊन जाणारे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडीत नेहरू यांच्याबद्दल आजही भारतीय जनमानसात आदराची भावना आहे. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे यांनी केले. स्टाफ सेक्रेटरी डॉ. अंबादास सकट यांनी प्रास्ताविक केले तर प्रा. भिमराव पटकुरे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.