वाई मतदार संघात आर.पी.आय. अपक्ष ट्रंपेटचा आवाज घुमतोय….
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
वाई मतदार संघात आर.पी.आय. अपक्ष ट्रंपेटचा आवाज घुमतोय….
वाई दि: लोकशाहीमध्ये सर्वांनाच निवडणूक लढवण्याचा नैतिक अधिकार दिलेला आहे. संविधानाने आपले हक्क अबाधित राखण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट पुरस्कृत अपक्ष उमेदवार सुहास एकनाथ मोरे यांचे चिन्ह आहे ट्रंपेट. हेच ट्रंपेट घेऊन ते वाई खंडाळा महाबळेश्वर मतदार संघात आचारसंहितेचे पालन करून प्रचार करत आहेत.
रिपब्लिकन पार्टी ऑफ ऑफ इंडिया या पक्षाची महायुती व महाविकास आघाडी सोबत राजकीय हितसंबंध असल्यामुळे दलित, पद दलित, कष्टकरी, शेतमजूर यांच्यावर अन्याय होत आहे. तरीसुद्धा राजकीय युती व आघाडी रिपब्लिकन पार्टी इमाने इतबारे पाळत आहे. त्यामुळेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च ताकद दाखवण्यासाठी
सुहास मोरे यांची उमेदवारी आहे. सातारा लोकसभा मतदारसंघांमध्ये तुतारी व ट्रंपेट यामधील फरक लक्षात न आल्याने महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पराभव पत्करावा लागला होता. ३७ हजार मते ट्रंपेटला मिळाल्याने रिपब्लिकन पार्टी गवई गटाचा उत्साह वाढलेला आहे. त्यामुळेच वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सहकार्याने अपक्ष उमेदवार यांनी गॅस सिलेंडर, ट्रंपेट हे निवडणूक चिन्ह घेऊन सातारा जिल्ह्यात उमेदवार उभे केलेले आहेत.
त्यांच्या निवडणुकीतील सहभागामुळे सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात चांगलीच चुरस निर्माण झालेली आहे. सध्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये समाधानकारकरीत्या सन्मान झालेला नाही. असे सर्वच नेते व कार्यकर्ते जाहीरपण बोलत आहे.
परंतु ,तुझं माझं पटेना तुझ्याशिवाय जमेना अशी अवस्था झालेली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पुरस्कृत अपक्ष उमेदवार सुहास मोरे यांनी प्रचारामध्ये एकला चलो रे चा नारा दिला आहे. त्यांच्यासोबत मोजकेच पण निष्ठावंत प्रचारक सहभागी झालेले आहेत.त्यांना उदंड प्रतिसाद लाभत आहे सुशिक्षित व निर्व्यसनी तसेच अभ्यासु व्यक्तिमत्व असल्याने ते मतदारांना चांगलीच छाप पाडत आहेत. वाई- खंडाळा- महाबळेश्वर मतदार संघातील ओझर्डे, शेंदुरजणे ,कवठे, सुरूर ,वेळे, बोपेगाव ,पाचवड, उडतारे, वीरमाडे, चिखली, चांदवली, देगाव, चिंधवली, अजनुज ,अहिरे, अतीत, भुईंज, बावधन, वाई शहर, पसरणी परकंदी लोहार, मांढरदेवी, खंडाळा, पांडे, केंजळ, व्याजवाडी, पारगाव, शिरवळ, लोणंद, व्याजवाडी, असले, पाचगणी, महाबळेश्वर कांदाटी खोरे, मेटगुताड अशा विविध भागात त्यांनी प्रचार यंत्रणा राबवताना स्वतः ट्रंपेट वाजवत आहेत. त्यामुळे त्यांचे मतदार हे कौतुक करत आहेत. त्यांच्यासोबत भगवान सोनवणे, विशाल कांबळे, शांताराम चव्हाण, सुकुमार माने, भगवान चव्हाण, प्रशांत कांबळे, विजय खामकर संदीप फरांदे, असलम डांगे, एकनाथ कांबळे, रमेश बगाडे, अजय कांबळे आदी कार्यकर्ते प्रचार इंटरनेट सहभागी होत आहेत. स्वतः ट्रंपेट वाजवणारा उमेदवार बघून मतदार व ग्रामस्थ तसेच शहरी भागातील लोक नवलाईने पाहत आहेत.
ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन