ताज्या घडामोडी

पुसेगाव:-खाकी वर्दीतील युतीच्या कार्यकर्त्यांकडून पुसेगावात तरुणास बेदम मारहाण केल्याचा आरोप.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

खाकी वर्दीतील युतीच्या कार्यकर्त्यांकडून पुसेगावात तरुणास बेदम मारहाण केल्याचा आरोप.

 

पुसेगाव दि: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारा निमित्त आरोप प्रत्यारोप होत आहे. परंतु, सातारा जिल्ह्यातील सेवागिरी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुसेगाव पोलीस ठाण्यात एका तरुणाला पोलीस निरीक्षक यांनी बेदम मारहाण केलेले आहे. याबाबत थेट मुख्य निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली आहे. दरम्यान, या प्रकारानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार आ. शशिकांत शिंदे यांच्यासह पुसेगाव परिसरातील ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा घेऊन सदर प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे.
याबाबत दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की मंगळवार दिनांक ५ नोव्हेंबर
२०२४ रोजी खटाव तालुक्यातील डिस्कळ येथील तरुण ओमकार आबासो शिपटे याने त्याच्या वैयक्तिक सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये महायुतीचे उमेदवार आ. महेश शिंदे एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये जमावा मध्ये बसून महिलांच्या डान्सला दाद देत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आ. महेश शिंदेंनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पुसेगाव पोलीस ठाण्यामध्ये ओमकार विरोधात तक्रार दिली. त्यानंतर उशिरा पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात बोलून घेतले. आ. महेश शिंदे यांच्या
कार्यकर्त्यासमोरच सराईत गुन्हेगाराप्रमाणे वागणूक दिली. सीसीटीव्ही कॅमेरे नसणाऱ्या खोलीमध्ये बाजूला नेऊन स पो नि संदीप पोमन यांनी शिवीगाळ व दमदाटी करत हात समोर करायला लावले आणि पट्ट्याने मारहाण केली. तसेच त्याच्याकडे असलेला मोबाईल सुद्धा पोलिसांनी जप्त केला.
याबाबत पुसेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी स.पो. नि. संदीप पोमन यांना गुन्हा काय?असा विचारणा केली असता त्यांनी तक्रारदाराचे नाव सांगितले नाही. संबंधित अधिकारी व पोलीस हे सत्ताधाऱ्यांचे गुलाम असल्याप्रमाणे एकतर्फी काम करताना दिसत आहेत. कोणतीही चूक नसताना पुसेगाव
पोलीस ठाण्याचे स पो नि संदीप पोमन यांनी कायदा हातात घेऊन
अमानुषपणे मारहाण केली आहे. तरी यासंबंधीचा त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करणे कामी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करणे बाबत देखी तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान याबाबत स.पो.नि. पोमन यांच्याशी दोन वेळा संपर्क साधला असता त्यांनी बाजू मांडण्याचे टाळले. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

खाकी वर्दीतील युतीच्या कार्यकर्त्यांकडून पुसेगावात तरुणास बेदम मारहाण नंतर निघालेला मोर्चा…

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button