ताज्या घडामोडी
सातारा:-कुरवली खुर्द वृध्दाश्रमातील वृद्धांनी केला शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प.
पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा संघटक

पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा संघटक
RPS STAR NEWS
कुरवली खुर्द वृध्दाश्रमातील वृद्धांनी केला शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प.
सातारा दि. 5 :- विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगारे फलटण तालुक्यातील कुरवली खुर्द येथील वृद्धाश्रमात मतदान जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
जागरुक मतदार लोकशाहीचा आधार, मतदान हा अधिकार नाही तर राष्ट्रीय कर्तव्य आहे, मतदानासाठी वेळा काढा आपली जबाबदारी पार पाडावी, चला मतदान करुया लोकशाही रुजवुया, 18 वर्षाचे वय केले पार मिळाला मतदानाचा अधिकार, आपले मतदान लोकशाहीचा प्राण, अशा आशयाचे फलक घेऊन वृद्धाश्रमात जनजागृती करण्यात आली.
यावेळी वृद्धाश्रमातील वृद्ध पुरुष व महिलांनी शंभर टक्के मतदान करण्याची ग्वाही दिली.