राष्ट्रीय बेस्ट टीचर अवॉर्डने सन्मानित मा. प्रदीप पवार सर
प्रतिनिधि:- महेश मोहिते सातारा

*मा प्रविन पवार यांना राष्ट्रीय बेस्ट टीचर अवार्ड प्रधान.* कोल्हापूर येथील अविष्कार सोशल ॲड एज्युकेशनल फाउंडेशन तर्फे आयोजित सामाजिक कॄतज्ञता समारोह 8 मे 2022 रोजी पणजी गोवा येथे संपन्न झाला. त्यावेळी भारतातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना पुरस्कृत करण्यात आले. त्यामध्ये सातारा नगरपालिका शाळा क्रमांक 17 चे मुख्याध्यापक मा. प्रवीण पवार सर यांना राष्ट्रीय बेस्ट टीचर अवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले प्रवीण पवार हे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा व सर्वांगीण विकासाचा नेहमी प्रयत्न करत असतात सामाजिक कार्यात हि त्यांचे योगदान असते. प्रवीण पवार सर हे आजपर्यंत अनेक पुरस्कारांने सन्मानित झालेले व्यक्तीमत्त्व आहे. या झालेल्या पुरस्कार सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून भाजपचे गोवा विधानसभेचे आमदार राजेश फलदेसाई , मुबंई उद्योजक सुनील नारकर , डाॅ पवार.आंतर राष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार व शिल्पकार संजय हरमलकर अविष्कार फाउंडेशनचे अध्यक्ष संजय पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. मा.पवार सर यांना पुरस्कार प्राप्त झाल्याने मा.खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले.नगराध्यक्ष कदम.उपनगराध्यक्ष मनोज शेंडगे. मुख्याधिकारी अभिजित बापट, प्रशासन अधिकारी मारूती भांगे. सर्व मुख्याध्यापक शिक्षक योजना धर्माधिकारी. संगीता घनवट आदी या सर्वांनी अभिनंदन केले व पुढील कामास शुभेच्छा दिल्या