पुणे:-भूमिपूजन समारंभ देवराजदादांच्या हस्ते संपन्न.
प्रतिनिधी रफिक शेख पुणे:-9021132121

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
भूमिपूजन समारंभ देवराजदादांच्या हस्ते संपन्न.
पुणे दि.१८ (रफिक शेख) : मौजे पाल ते हरपळवाडी मार्गातील भैरोबा ओढ्यावरील नवीन पुलाचे भराव, खडीकरण व डांबरीकरणासाठी कराड उत्तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष मा.श्री देवराज दादा पाटील साहेब यांच्या प्रयत्नातून रस्त्याचे भूमिपूजन समारंभ करण्यात आला.
कराड उत्तरचे आमदार मा.श्री. बाळासाहेब पाटील साहेब यांच्या पाठपुराव्याने शासनाच्या 50-54 हेड मधून 20 लक्ष रुपये रस्त्यासाठी मंजूर झाले.
सदर कामाचा भूमिपूजन समारंभ 17-3-2023 रोजी सकाळी 9.30 वाजता कराड उत्तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष मा.श्री. देवराज दादा पाटील यांच्या शुभहस्ते व पाल, हरपळवाडी व भगतवाडी ग्रामस्थांच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाला.
यावेळी पाल ते हरपळवाडी मार्गातील भैरोबा ओढ्यावरील नवीन पुलाचे भराव, खडीकरण व डांबरीकरनासाठी शासनाच्या 50-54 हेड मधून 20 लक्ष रुपये कामाच्या भूमिपूजन करताना श्रीमंत देवराज दादा पाटील साहेब सोबत सर्व सहकारी, आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व पाल हरपळवाडी व भगतवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.