मायणी:-एडवोकेट श्रीराम देव ज्योतिषाचार्य पदवीने सन्मानित.
प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
एडवोकेट श्रीराम देव ज्योतिषाचार्य पदवीने सन्मानित. मायणी प्रतिनिधी___ज्योतिष मंडळ सातारा व द्रोणाचार्य प्राचार्य रमणलाल शहा यांनी टिळक स्मारक मंदिर पुणे येथे आयोजित केलेल्या ज्योतिष शास्त्राच्या नियमात जगातील असंख्य व्यक्ती व ज्योतिषशास्त्राची प्रचिती या पुस्तकाच्या कार्यशाळेत ज्योतिष मंडळ सातारा येथील सचिव एडवोकेट श्रीराम भालचंद्र देव यांना ज्योतिषाचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले ही पदवी माजी महसूल आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते व प्राचार्य रमणलाल शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आली. यावेळी ज्योतिषाचार्य चंद्रकांत शेवाळे नंदकिशोर जकातदार विजय जकातदार शिरीष चिटणीस संजय इनामदार सौ जयश्री बेलसरे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना द्रोणाचार्य प्राचार्य रमणलाल शहा यांनी सांगितले की श्रीराम देव यांनी ज्योतिष शास्त्रात सतत चिंतन अभ्यास संशोधन आणि हजारो पत्रिकांचे विश्लेषण केल्याने त्यांना ज्योतिषाचार्य या पदवीने सन्मानित करण्यात येत आहे यावेळी एडवोकेट श्रीराम देव यांनी सांगितले की ज्योतिषशास्त्रात चिंतन मनन करण्यासाठी अनेक विषय आहेत सर्व ज्योतिषांनी सखोल अभ्यास करावा मगच फलादेश करावा असे त्यांनी सांगितले यावेळी सौ अर्चना रांजणे गोविंद कोष्टी सौ सपना पवार पद्मा कासट बाबुराव कदम मंगेश जोशी राखी कदम प्रमोद ढाणे उपस्थित होते