श्रीरामपूर:-शेतकऱ्यांचे सोयाबीन चोरी करणारी आणखी एक टोळी जेरबंद, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर कार्यालयाची कारवाई.
पत्रकार आदिनाथ कडू राहाता तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

शेतकऱ्यांचे सोयाबीन चोरी करणारी आणखी एक टोळी जेरबंद, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर कार्यालयाची कारवाई.

प्रस्तुत प्रकरणी हकीगत अशी की, यातील फिर्यादी श्री. गोरक्षनाथ भीमराज ढवळे, रा.नायगाव, ता.श्रीरामपूर यांनी त्यांचे शेतातील पत्रयाचे शेड मध्ये ठेवलेले एकूण १५ गोण्या अंदाजे ११ क्विंटल सोयाबीन, एकूण ४५,०००/– रु.किं.चे हे दि.०६/११/२०२५ रोजी १६.०० ते दि.०८/११/२०२५ रोजी १६.०० वा. चे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने लबाडीचे इराद्याने शेडमध्ये ठेवलेल्या सोयाबीनच्या गोण्या स्वतःचे फायद्याकरीता चोरून नेल्या होत्या म्हणून श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे दि.०८/११/२०२५ रोजी गु.र.नं. ४८७/२०२५ भा.न्या.सं.कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.
श्री. सोमनाथ वाकचौरे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सदरचा गुन्हा हा आरोपी नामे सचिन जगन्नाथ मोरे, रा. नायगाव, ता. श्रीरामपूर याने त्याचे साथीदारांसह केला असल्याचे समजल्याने त्यास पकडण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर कार्यालयातील पोलीस अंमलदार यांनी सापळा रचून आरोपी १)सचिन जगन्नाथ मोरे, वय ३०, रा.नायगाव ता.श्रीरामपूर जि.अहिल्यानगर यास ताब्यात घेऊन त्याचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. त्यास त्याचे साथीदाराचे नाव विचारले असता त्यांने त्यांची नावे २)हरिदास अर्जुन निकम, वय १९ वर्ष, रा. नायगाव, ता.श्रीरामपूर जि.अहिल्यानगर. ३)शुभम जालिंदर मोरे, वय १९ वर्ष, रा. नायगाव, ता.श्रीरामपूर जि. अहिल्यानगर. ४)तुषार अनिल सदाफुले, वय २३ वर्ष, रा. नायगाव, ता.श्रीरामपूर जि. अहिल्यानगर. ५)विशाल अशोक गायकवाड, वय २१ वर्ष, रा. नायगाव, ता.श्रीरामपूर जि. अहिल्यानगर असे सांगितले.
त्यावरून लागलीच उर्वरीत आरोपी यांना पकडण्यासाठी तपास पथकाने सापळा रचून वरील नमूद आरोपींना ताब्यात घेतले असता नमूद आरोपी यांनी एकत्र येऊन सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. त्यापैकी काही आरोपी हे फिर्यादीचे घराशेजारी राहणारे असून त्यांनी प्रथमत: साठविलेल्या सोयाबीनची पाहणी केली नंतर रात्री उशीरा आरोपी तुषार अनिल सदाफुले याचे पीकअप वाहन घेवुन येवुन शेडमध्ये ठेवण्यात आलेल्या सोयाबीनच्या गोण्या चोरून नेलेबाबत सांगितले आहे. सदर गुन्ह्यातील चोरीचा माल खरेदी करणाऱ्या व्यापाराचा तपास पथक कसोशीने शोध घेत असून पुढील तपास पोहेकाॅ/ परेश आगलावे, श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन हे करत आहेत.
सदरची कारवाई ही मा.श्री. सोमनाथ घार्गे सो, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, श्री. सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, श्री.जयदत्त भवर, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर कार्यालयातील पो.स.ई. चारुदत्त खोंडे, पो.हे.काॅ. दादासाहेब लोंढे, पो.ना.संदीप दरंदले, पो.काॅ. राजेंद्र बिरदवडे, पो.काॅ. सहदेव चव्हाण, पो.काॅ.अशोक गाढे, व मोबाईल सेलचे पो.हे.काॅ. संतोष दरेकर, पो.हे.काॅ. सचिन धनाड, पो.ना. रामेश्वर वेताळ तसेच श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पो.नि. अरुण धनवडे, पो.हे.काॅ. परेश आगलावे यांनी केली आहे.




