मुंबई:-मला हलक्यात घेऊ नका, दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा इशारा.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
मला हलक्यात घेऊ नका, दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा इशारा.
मुंबई : लाडकी बहीण व जनतेच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री पद सांभाळले आहे.
साथीने घासून पुसून नव्हे तर
ठासून दोन वर्षे पूर्ण केली. कारण मी
बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक
आहे, मी आनंद दिघे यांचा चेला आहे,
असा स्वस्तात परत जाणार नाही. मी
मैदानातून पळणारा नाही, तर लोकांना
पळवणारा आहे. कट्टर शिवसैनिक कधीच मैदान सोडत नाहीत. त्यामुळे मला हलक्यात घेऊ नका, असा इशारा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद
मैदानात झालेल्या शिवसेनेच्या दसरा
मेळाव्यात दिला.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व मान्यवरांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांना दोन मिनिटे उभे राहून सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
त्यानंतर मान्यवरांनी विशेषता ज्योती वाघमारे ,गुलाबराव पाटील, रामदास भाई कदम यांनी थोडक्यातच आपले मनोगत व्यक्त करून शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर टीका केली.
यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणामध्ये शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला. कोरोना काळात बंगल्यात बसून कामकाज करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना सर्वसामान्यांचे सुखदुःख माहीत नाही. आम्ही पीपी किट लावून लोकांच्या आरोग्यासाठी धावत होतो.’जिथे टेंडर, तिथे सरेंडर’ हे ठाकरेंचे धोरण होते.
कंत्राटदारांची लूट करताना जनाची नाही तर मनाची लाज वाटायला हवी होती. धारावीचा, मुंबईचा विकास होईल हे सगळे मी पाहतोय. धारावीतील
प्रकल्पात काड्या घालण्याचे काम सुरू आहे. तुम्ही बंगल्यावर बंगले बांधा, पण धारावीकरांना रस्त्यावर ठेवा. धारावीत आम्ही २ लाख १० जणांना घरे देणार, पात्र-अपात्र बघणार नाही. २लाख कोटी रुपयांची घरे देणार. प्रत्येकाचे घराचे
स्वप्न आम्ही पूर्ण करणार, असा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
शेतकरी बळीराजा हे आपले अन्नदाता आहेत.त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम आम्ही करतआहोत. माता-भगिनी यांच्यासाठी आम्ही काम करत आहोत. या तिजोरीवर पहिला हक्क कोणाचा शेतकऱ्यांचा आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. तुम्हाला शेतकऱ्याचा मुलगा का पचत नाही ? सोन्याचा चमचा तोंडात घेऊन नाही आलो. हे
सगळे डॉ. बाबासाहेबांच्या संविधानामुळे शक्य झाले, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान राहील याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.
विरोधकांनी माझ्यावर माझ्या दाढीबावत टीका केली. पण याच दाढीवाल्याने महाविकास आघाडी उद्ध्वस्त केली.
मी घरात बसणारा मुख्यमंत्री नाही, असा टोला त्यांनी विरोधकांना हाणला.
मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा जाहीर करा,म्हणत ते फिरत आहेत. दिल्लीच्या घरोघरी कोण फिरत आहे
आपल्याला माहीत आहे. तुमच्या सहकाऱ्यांना तुमचा चेहरा चालत नाही, जनतेला कसा चालेल.फेसबुक लाइव्हच्या व्यतिरिक्त तुम्ही काय केले ते
सांगा. कोरोनाच्या काळात घोटाळा केला. इकडे लोक मरत होते आणि तुम्ही पैसे मोजत होतात, कुठे फेडाल हे पाप ?, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली. या दसऱ्या मेळाव्याला उपस्थित शिवसैनिकांसाठी खास समोसे व पिण्याच्या पाण्याची मोफत सोय करण्यात आली होती. तसेच यावेळी काहींनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला.
या दसऱ्या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात विदर्भ मराठवाडा खानदेश नाशिक मनमाड कोकण बुलढाणा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे ठाणे नवी मुंबई वाशी पनवेल व मुंबई परिसरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस यंत्रणेने मुंबईत आलेल्या सर्व शिवसैनिकांना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांना दसरा मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी सहकार्य केले. शिवसैनिकांनी सुद्धा स्वयंसेवकाची भूमिका घेऊन सर्वांची व्यवस्था केली. यावेळी काही शिवसैनिकांनी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्याचे बॉक्स घेऊन गेले. तर या मैदानावर अनेकांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या टोप्या व झेंडे तसेच टाकून निघून गेले होते. विशेष बाब म्हणजे दुपारी कोसळणाऱ्या पावसामुळे मैदानात चिखल झाला असला तरी या मैदानाची तातडीने दुरुस्ती करण्यात आल्यामुळे फारसा व्यत्यय आला नाही.
———————————
फोटो आजाद मैदानावर झालेल्या दसरा मेळाव्यात मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जमलेला जनसमुदाय तसेच वैद्यकीय कक्ष केंद्र प्रमुख डॉक्टर मंगेश चिवटे, सातारा शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव व अजित जगताप (छाया- निनाद जगताप, मुंबई)