आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फलटण – जीवन शिक्षण विद्यामंदिर व नवमहाराष्ट्र विद्यालय, बिदाल या हायस्कूलच्या सन १९७५ च्या १० वी बॅचचा ४९ वा स्नेहसंमेलन मेळावा संपन्न.

सह - संपादक अशितोष चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

सह – संपादक अशितोष चव्हाण

फलटण – जीवन शिक्षण विद्यामंदिर व नवमहाराष्ट्र विद्यालय, बिदाल या हायस्कूलच्या सन १९७५ च्या १० वी बॅचचा ४९ वा स्नेहसंमेलन मेळावा संपन्न.

फलटण – जीवन शिक्षण विद्यामंदिर व नवमहाराष्ट्र विद्यालय, बिदाल या हायस्कूलच्या सन १९७५ च्या १० वी बॅचचा ४९ वा स्नेहसंमेलन मेळावा हा ताज पॅलेस, बिरदेवनगर, जाधववाडी, फलटण येथील शाळेचे माजी विद्यार्थी प्रसिद्ध कर सल्लागार ॲड.शहाजहान इस्माईल शेख यांच्या निवासस्थानी आज पार पडला.

कार्यक्रमासाठी एकूण ३२ माजी विद्यार्थी मुंबई, ठाणे, अलिबाग, पुणे, पाटण, इस्लामपूर, सातारा, मायणी, दहिवडी, बिदाल व इतर ठिकाणाहून सपत्नीक आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात दिवंगत माजी विद्यार्थांना श्रद्धांजली वाहून झाली त्यानंतर शेख उभयतांनी आलेल्या जोडप्यांचे शाल श्रीफळ फुल साडीचोळी व ज्ञानेश्वरी ग्रंथ देवून सत्कार करण्यात आला. आपला वर्ग पुन्हा भरला अस म्हणत, स्वागत समारोहानंतर सर्व विद्यार्थ्यांचे त्यावेळेसचे माजी शिक्षक श्री पडवळ सर जे खास कार्यक्रमासाठी पाटण वरुन सपत्नीक आले होते त्यांनी सर्वांना खुप छान संबोधन केले.
त्यानंतर सगळ्यांनी छान अश्या मालवणी मांसाहारी व पुरणपोळीच्या शाकाहारी जेवणावर ताव मारला.
सोबतच स्वर-विनायक म्युझिकल कराओके ऑर्केस्ट्रा यांचा जुन्या हिंदी मराठी भावगीतांचा खुप छान कार्यक्रम सर्वांनी एन्जॉय केला, ‘जरा विसावू या वळणावर’ व ‘मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा’ या गीतांवर सर्वांना आश्रु अनावर झाले.
शेवटी समारोपा वेळी चहापानानंतर मनोगत व्यक्त करताना सर्वांचे डोळे भरुन आले होते अत्यंत भावनिक वातावरणात एकमेकांना दरवर्षी जोपर्यंत जीवंत आहोत तोपर्यंत असच भेटत रहाण्याची हमी देऊन सर्वांनी एकमेकांचा भावपूर्ण निरोप घेतला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री उत्तम जगदाळे, श्री परशुराम जगदाळे, श्री मानसिंग जगदाळे व श्री व सौ शेख व मित्र परिवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
आजच्या या एवढ्या धकाधकीच्या जीवनात “बी प्रॅक्टिकल” रहाणा-या समाजात या सर्व मित्रांची एकमेकांना भेटण्याची ओढ खरच पाहण्यासारखी होती. त्यावेळेस सोळाव्या वर्षात असणा-या मुला-मुलींमधील निरागस भावना व उत्साह आता या ६५ व्या वर्षीदेखील तसाच अभूतपूर्व दिसत होता. खरच आयुष्याच्या डेस्टीनेशन मध्ये मैत्रीच्या रियुनियनचे स्टेशन दरवर्षी आलेच पाहिजे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button