फलटण:-राष्ट्रवादी (अप) गटातून फलटणसाठी आ.चव्हाण यांची उमेदवारी घोषित.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
राष्ट्रवादी (अप) गटातून फलटणसाठी आ.चव्हाण यांची उमेदवारी घोषित.
फलटण दि: महाराष्ट्र विधानसभेच्या पुढील महिन्यात निवडणुका होत आहेत. त्याबाबत सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने फलटण या अनुसूचित जातीसाठी राखीव मतदार संघाची उमेदवारी विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ. दीपक प्रल्हाद चव्हाण यांच्या नावाची घोषणा सोळशी ता. कोरेगाव येथे राष्ट्रवादी नेत्यांनी घोषित केलेली आहे .
सातारा जिल्ह्यातील फलटण- कोरेगाव विधानसभा मतदारसंघात यापूर्वी राखीव मतदार संघातून पहिले आमदार होण्याचा मान आमदार दीपक चव्हाण यांनी पटकावला होता. शांत व संयमी तसेच कोणत्याही प्रकारचे वादग्रस्त विधान न करणारे आमदार म्हणून त्यांची विधिमंडळामध्ये एक नवीन व चांगली ओळख आहे. आदरणीय फलटणचे राजे व मुरब्बी राजकारणी रामराजे नाईक निंबाळकर यांचे अत्यंत विश्वासू व सेवेकरी म्हणून आमदार दीपक चव्हाण हे परिचित आहेत. चर्मकार समाजाचे आ. चव्हाण यांचे मूळ गाव तरडगाव तालुका फलटण असून त्यांचे शिक्षण१९९३ मध्ये मुधोजी महाविद्यालय, फलटण, जिल्हा सातारा येथे व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून पदव्युत्तर एमए आणि १९९६ साली जयवंत आवळे शिक्षण महाविद्यालय, इचलकरंजी येथे बी.एड शिक्षण झाले . शिक्षक म्हणून त्यांनी नोकरीस सुरुवात केली. ते तिसऱ्यांदा आमदार होण्याची स्वप्न बाळगून आहेत.
कोणतेही राजकारण न करता आदरणीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे नाईक निंबाळकर व रघुनाथ राजेनाईक निंबाळकर हे जे सांगतील ते धोरण व ते बांधतील ते तोरण या न्यायाप्रमाणे आमदार चव्हाण हे अनेकदा वागत असल्यामुळे त्यांच्यावर अनेकदा राजकीय टीका सुद्धा झालेली आहे. परंतु, त्या टीकेला उत्तर देण्याच्या भानगडीत ते पडत नाहीत. हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.
यंदाच्या तिसऱ्या आमदारकीच्या टर्ममध्ये त्यांना फलटण- कोरेगाव मतदार संघातून अनेक इच्छुकांचे चांगलेच मोठे आव्हान निर्माण झालेले आहे. त्यामुळे त्यांचे नेते अजित दादा पवार व रामराजे नाईक निंबाळकर हे त्यांच्या विजयासाठी नक्कीच झटतील. याबद्दल शंका नाही. परंतु, महायुतीमध्ये असलेले भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार गटात असलेले काही इच्छुक उमेदवार या घोषणाबाजीमुळे चांगलेच नाराज झालेले आहेत. त्यांची मनधरणी करावी लागणार आहे. अन्यथा त्यांना बंडाचाही फटका बसणार आहे. असे सध्या तरी चित्र दिसत आहे.
फलटण- कोरेगाव मतदार संघामध्ये जाणीवपूर्वक अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने मागासवर्गीय मातंग, बौद्ध व इतर समाजाला डावळल्यामुळे आता खऱ्या अर्थाने शिवसेना उभाठा गट किंवा ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांचे राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय काँग्रेस महाविकास आघाडीतून नेमके कोणाला उमेदवारी देणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
विधानसभेची ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. कारण, या फलटण- कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांचे सुद्धा लक्ष लागणार आहे. नुकत्याच झालेल्या माढा खासदारकीच्या निवडणुकीत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे फलटणचे सुपुत्र व भाजपचे उमेदवार माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव झाला होता. या पराभवचा वचपा काढण्यासाठी ते सुद्धा सज्ज झालेले आहेत.
बुद्धिबळाच्या खेळामध्ये जसे राजाला चेक देण्यासाठी सोंगट्यांचा बळी घेतात. तशा पद्धतीने आता फलटणचे राजकारण गाजणार आहे. हे निश्चितच आहे. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार सत्तेत आले व आ. दीपक चव्हाण हे निवडून आले तर त्यांचे मंत्रिपद निश्चित आहे. याची आता चर्चा सुरू झालेली आहे. या जर तर च्या गोष्टी असल्यामुळे आधी लगीन विधानसभा निवडणुकीचे नंतर मंत्रीमंडळाची असे संकेत मिळू लागलेले आहेत. दरम्यान ,फलटणमध्ये महायुती एक संघ राहील की महाविकास आघाडी योग्य उमेदवार देतील याकडे आता सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. दरम्यान, फलटण विधानसभा मतदारसंघात मातंग व बौद्ध समाज एक संघ झाल्यास शिवसेनेचे उमदे नेतृत्व व डॅशिंग कार्यकर्ता अमोल आवळे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक रमेश आढाव यांचेही नाव त्याचबरोबर भाजपमधून फलटणच्या सुपुत्र कुमार शिंदे यांची नावाची चर्चा होऊ लागलेली आहे.