कणकवली:-वन्यजीव जैवविविधतेचे राखणदार सुहास पाटील.
पत्रकार शैलेश मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
वन्यजीव जैवविविधतेचे राखणदार सुहास पाटील.

॥ कणकवली : जैवविविधतेचे रक्षण करणारे वन्यजीव हे राखणदार आहेत. त्यामुळे वन्य जीवांची हत्या रोखण्यासाठी वनविभाग कार्यरत असले तरी नागरिकांनी वन्यजीवांच्या हत्या रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कणकवली वनपरिक क्षेत्र अधिकारी सुहास पाटील यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या वनविभाग सावंतवाडी आणि वनपरिक्षेत्र कणकवली व सर्पमित्र संघटना सिंधुदुर्ग जिल्हा यांच्यावतीने वन्यजीव
सप्ताहनिमित्त खारेपाटण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे वन्यजीव रक्षण व सापांच्या विविध प्रकारच्या प्रजाती याबाबतची मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली होती. याप्रसंगी श्री. पाटील बोलत होते. यावेळी सर्प इंडिया सिंधुदुर्ग या टीमचे प्रमुख मार्गदर्शक मंदार राणे, प्राचार्य संजय सानप, प्राचार्य डॉ. ए डी कांबळे, प्रा. दयानंद कोकाटे, यश कॉम्प्युटर अॅकॅडमीचे संचालक मंगेश गुरव, वन परिमंडळ फोंडयाचे वनपाल धुळू कोळेकर, मार्गदर्शक जितेंद्र कोर्लेकर, रॅपिड रेस्क्यू टीम कणकवलीचे अंकुश माने, अमोल पटेकर, प्रशांत कांबळे, विजय भोसले, शुभम पाटील आदी उपस्थित होते.




