ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मावळ :-ठाकुरसाई गावच्या उपसरपंच पदी मंगल संतोष कार्के यांची बिनविरोध निवड.

प्रतिनिधी धर्मेंद्र ठाकर मावळ:-9960044802

मावळ :-ठाकुरसाई गावच्या उपसरपंच पदी मंगल संतोष कार्के यांची बिनविरोध निवड.
ठाकुरसाई-गेवंडे खडक ग्रुप ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी मंगल संतोष कार्के यांची बिनविरोध निवड कण्यात आली. मावळत्या उपसरपंच रेखा रामदास ठाकर यांनी ठरल्याप्रमाणे उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी सरपंच नारायण बोडके यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. या वेळी निर्धारित वेळेत मंगल कार्के यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेवक नंदा बाबर यांनी घोषित केले. या वेळी सरपंच नारायण बोडके, कमल मानकर,अरविंद रोकडे,निवृत्ती ठाकर, प्रकाश ठाकर,राजू ठाकर, नवनाथ कार्के, प्रदीप ठाकर ग्रामसेवक नंदा बाबर, आणि इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

गावच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार ! मंगल कार्के
ठाकुरसाई च्या उपसरपंच पदी निवड झाल्याने गावातील आरोग्य, पाणी, रस्ते आणि सांडपाणी व्यवस्था या मुलभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार असून गावातील इतर समस्या सोडविण्यासाठी पर्यंत करणार असल्याचे मंगल कार्के यांनी सांगितले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button