मेढा नगरपंचायतीसाठी शिवसेना धनुष्यबाण घेणार वेध- एकनाथ भाई ओंबळे
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

मेढा नगरपंचायतीसाठी शिवसेना धनुष्यबाण घेणार वेध- एकनाथ भाई ओंबळे

मेढा दि: जावळी तालुक्याचे महत्वपूर्ण ठिकाण असलेल्या मेढा नगरपंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. तीस वर्षांपूर्वी शिवसेनेचा भगवा फडकवण्यास यश मिळवणारे ऐतिहासिक मेढा नगरीचे नवे जुने कार्यकर्ते आता नगरपंचायतीवर शिवसेनेचा शिव धनुष्य वेधण्यासाठी सज्ज झाले आहेत. सह संपर्कप्रमुख एकनाथभाई ओंबळे यांच्या प्रचाराची रणनीती शिवसैनिकांसाठी चैतन्यमय ठरली आहे.
मेढा नगरपंचायत १७ प्रभाग असून थेट नगराध्यक्ष पदास ३५ ते ४० जण इच्छुक असून काहींच्या शिवसेनेच्या वतीने मुलाखती दिलेले आहेत. शिवसेनेची महायुती मधील ताकद पाहता मेढा नगरपंचायतीवर शिवधनुष्य यश संपादन करेल. यासाठी उपमुख्यमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि सातारा जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई त्याचबरोबर जावळी तालुक्यातील प्रत्येक खेड्यापाड्यांमध्ये संपर्क असलेले व गेले अनेक वर्ष शिवसेनेचे काम करणारे एकनाथभाई भाई ओंबळे यांच्या आरोग्य सेवेच्या कामासोबतच सामाजिक कामाची दखल निश्चितच जावळीकर घेणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत विश्वासू व जवळचे शिवसैनिक म्हणून श्री ओंबळे यांच्या नेतृत्वाखाली व संपर्कप्रमुख म्हणून त्यांनी ७ बाय २४ फॉर्म्युलानुसार सातारा जिल्ह्यात
संपर्क ठेवून शिवसेना या चार शब्दावर विश्वास संपादन केला आहे.
शिवसेना संपर्कप्रमुख अंकुश कदम, सातारा जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले, समीर गोळे, सचिन करंजेकर, संजय सुर्वे, शांताराम कदम, सुधीर करंदकर, संदीप तरडे, विजय शेलार, सुरेश मोरे व शेकडो शिवसैनिकांच्या सहकार्याने भगवा फडकवण्यासाठी जीवाचे रान करीत आहेत . लोकांना सुखदुःखात धावून येणारे नेते म्हणून सहसंपर्कप्रमुख एकनाथभाई ओंबळे यांना उदंड प्रतिसाद लाभत आहे. महायुती एक संघ ठेवण्यासाठी शिवसेनेच्या वतीने दोन पावले पुढे टाकण्यात आली आहे . आक्रमक बोलून मनोरंजन करण्यापेक्षा लोकांची कामे आक्रमकरीत्या करण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे . सध्या शिवसेना मेढा नगरपंचायतीमध्ये भक्कमरित्या सत्ता स्थापन करून नगराध्यक्षपदी भगवा फडकवणार असल्याचा निर्धार मतदारांनीही केला आहे. नव जुन्याचे समीकरण अबाधित ठेवून शिवसेनेच्या नगराध्यक्ष बनवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनीही कानमंत्र दिला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने इच्छुक उमेदवारांसोबतच त्यांच्या प्रचारासाठी परिश्रम घेणाऱ्या शिवसैनिकांमध्ये इर्षा निर्माण झाली आहे.
शिवसेनेचा धनुष्यबाण जावळीचा स्वाभिमान.. एकनाथ शिंदे व पालकमंत्री देसाई यांचा अभिमान अबाधित राखण्यासाठी शिवसेना सह संपर्कप्रमुख ओंबळे यांना निश्चित यश येईल असे मानण्यात येत आहे.




