वाई:-एन.एस.एस.मध्ये नेतृत्व विकसित होते – प्रा.डॉ. सुनील सावंत ‘किसन वीर’ मध्ये एन.एस.एस. सप्ताहानिमित्त व्याख्यान.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR
RPS STAR NEWS
वाई दि.25
एन.एस.एस.मध्ये नेतृत्व विकसित होते
– प्रा.डॉ. सुनील सावंत
‘किसन वीर’ मध्ये एन.एस.एस. सप्ताहानिमित्त व्याख्यान.
वाई एन.एस. एस.च्या स्वयंसेवकांनी स्वतःबरोबरच समाजाचाही विचार करावा. कूपमंडूक वृत्ती सोडून सर्वांगीन विचार करावा. स्वतःबरोबरच राष्ट्राचा विकास साधताना सजग रहावे. कारण एन.एस.एस.मुळे नेतृत्व विकसित होते . असे प्रतिपादन इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. (डॉ.) सुनील सावंत यांनी केले.
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्तच्या सप्ताहानिमित्त आयोजित व्याख्यानात ते *नॉट मी बट यू* या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. कार्यक्रमास कला विभागाचे उपप्राचार्य व एन.एस. एस.चे सल्लागार प्रा. (डॉ.) चंद्रकांत कांबळे, कार्यक्रम अधिकारी डॉ. संग्राम थोरात, डॉ. अंबादास सकट यांची उपस्थिती होती.
डॉ. सावंत म्हणाले, समाजसेवेतून एन एस एस चा स्वयंसेवक महात्मा गांधी यांच्या सर्वोदय या विचाराशी जोडला जाऊ शकतो. परंतु त्यासाठी स्वयंसेवकांनी स्व चा त्याग करून व संकुचित वृत्तीतून बाहेर पडून, स्वतःचे व्यक्तिमत्त्व प्रगल्भ बनवावे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम ते शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार एन एस एस च्या उद्देशांशी मिळते जुळते आहेत. या विचारांचे ग्रहण केल्यास स्वयंसेवक घडेल. आपल्या व्याख्यानातून त्यांनी एन एस एस च्या स्थापनेचा इतिहास सांगितला.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले, विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयीन जीवन हे सुवर्णक्षण असतात. एन एस एस च्या माध्यमातून समाजाच्या ॠणातून मुक्त होण्याची संधी मिळते. या विभागाचा स्वयंसेवक कॉलेजला समाजाशी जोडतो.
डॉ. चंद्रकांत कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम अधिकारी डॉ. संग्राम थोरात यांनी प्रास्ताविक केले. डॉ . अंबादास सकट यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. अरुण सोनकांबळे यांनी सूत्रसंचालन केले. श्रीमती सुमती कांबळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. संदीप वाटेगांवकर, कनिष्ठ लिपिक जितेंद्र चव्हाण, स्वीटी नरवाडे, नम्रता शेलार, धनश्री जाधव, राणी काळे, राणी सणस, अश्विनी गोळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात एन.एस. एस.च्या स्वयंसेवकानी सहभाग घेतला.बोलताना, प्रा. डॉ. सुनील सावंत, व्यासपीठावर प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत कांबळे, कार्यक्रम अधिकारी डॉ. संग्राम थोरात, डॉ. अंबादास सकट व इतर मान्यवर उपस्थित होते.
ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन