पुणे:-पिंपरी-चिंचवडचे नवे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
पिंपरी-चिंचवडचे नवे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे.
पिंपरी, दि. १४ (शफीक शेख) :- विनय कुमार चौबे यांनी बुधवारी (दि.14) सायंकाळी अंकुश शिंदे यांच्याकडून पिंपरी चिंचवडच्या पोलिस आयुक्तपदाचा पदभार स्विकारला.
अपर पोलीस महासंचालक (Addl DGP) असलेले विनय कुमार चौबे हे पिंपरी-चिंचवडचे पाचवे पोलीस आयुक्त आहेत.
अंकुश शिंदे यांची नाशिक पोलीस आयुक्तपदी बदली झाली आहे. याबाबतचे आदेश गृह विभागाने मंगळवारी रात्री काढले आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी तत्कालीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी ‘दिशा’ उपक्रम राबविला. याशिवाय बेसिक पोलिसिंगवर भर दिला. यामध्ये कोम्बिंग ऑपरेशनसह गुन्हेगारांवर वॉच ठेवण्यात आला. तसेच शिंदे यांनी स्वत:लॉटरी सेंटरवर कारवाई केली. यानंतर ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई केली त्या पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना नियंत्रण कक्षाशी संलग्न केले तर इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली केली.
दरम्यान, मंगळवारी रात्री अंकुश शिंदे यांची बदली होऊन विनय कुमार चौबे यांची पिंपरी चिंचवड आयुक्तपदी गृह विभागाने नियुक्ती केली. चौबे यांनी आज (बुधवार) सायंकाळी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला.