ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सांगोला:-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोल्यात आयोजित भव्य रोजगार मेळावा.

पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा ACLS Chief Reporter

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा ACLS Chief Reporter

सांगोला:-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोल्यात आयोजित भव्य रोजगार मेळावा.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोल्यात आयोजित केलेल्या भव्य रोजगार मेळाव्यास उपस्थित राहून आनंद वाटला. रोजगार मेळावा, ब्लँकेट वाटप, साडी वाटप, मुलींना सायकल वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप, शिलाई मशीन वाटप करण्यात आले.

दीपकआबांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील सर्व घटकांना एकत्रित घेऊन कार्यक्रम राबविण्यात येत आहेत याचे समाधान आहे. दीपकआबा आणि शहाजीबापू यांचे पक्ष व राजकारण वेगवेगळे असले तरी दोघांनी मैत्री जपली आहे याचे विशेष कौतुक आहे.

महायुतीच्या सरकारने यावर्षीपासून जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे गणवेश तयार करण्याचे काम महिला बचत गटांना देण्यात येणार आहे. बचत गटातील उत्पादित मालाची विक्री होण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. लोकांसोबत बांधिलकी असेल तर जनता तुमच्या पाठीशी राहते असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी आमदार निलेश लंके, आमदार शहाजीबापू पाटील, राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील, कल्याणराव काळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, जेष्ठ नेते बाबुराव गायकवाड, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयमाला गायकवाड, प्रा. पी. सी. झपके, समाधान काळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजी पाटील, माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ, जिल्हा नियोजन समिती सदस्य सुरेश पालवे, डॉ.पियूष साळुंखे-पाटील, यशराजे साळुंखे पाटील, अनिलनाना खटकाळे, सचिन लोखंडे, सूर्याजी खटकाळे, दादासाहेब लवटे, अक्षय भांड, अभिषेक आव्हाड यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button